‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

‘सूर्यकांत कदम परत येतोय!’, अभिनेते भरत जाधव दिसणार मालिकेत, जाणून घ्या कोणत्या

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2024 10:51 AM IST

मराठमोळे अभिनेते भरत जाधव छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ते एका मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहेत. आता ही मालिका कोणती चला जाणून घेऊया..

Bharat Jadhav: अभिनेते भारत जाधव दिसणार मालिकेत
Bharat Jadhav: अभिनेते भारत जाधव दिसणार मालिकेत

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून भरत जाधव ओळखले जातात. कधीकाळी विनोदाच्या टायमिंगने रंगभूमी गाजवणारे भरत जाधव संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आहेत. त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ते काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसले होते. आता भरत जाधव छोट्या पडद्यावरील एका मालिकेत दिसणार आहेत. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे. पण ही मालिका कोणती हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

कोणत्या मालिकेत दिसणार

भरत जाधव हे झी मराठी वाहिनीवरील 'पारु' या मालिकेत दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पारु' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये सूर्यकांत कदम या खलनायकाची एण्ट्री होणार असल्याचे दाखवण्यात आले होते. आता या खलनायकाची भूमिका अभिनेते भरत जाधव करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा: 'रानू मंडल झालाय बिचारा', ट्रोल करणाऱ्या यूजर्सला अभिनेता गौरव मोरेचे सडेतोड उत्तर

काय आहे मालिकेच्या प्रोमो?

भरत जाधव एक दमदार खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. पारु मालिकेच्या प्रोमो मध्ये तुम्ही सूर्यकांत कदमचा आकर्षक लुक पाहिला असेल. जितका खतरनाक लुक आहे तितकीच जबरदस्त ही भूमिका आहे. सूर्यकांत कदम अहिल्यादेवींच्या आयुष्यात उलथापालथ करायला आला आहे. तर दुसरीकडे पारू आपल्या निरागस स्वभावाने सगळयांना गावाकडच्या जीवनाचा आनंद घ्यायला शिकवत आहे. गावच्या वेशात पारू आदित्य आणि प्रीतमला तयार करते. आदित्य ही पारूला हरीषसाठी प्रेमाची दारं उघडायला सांगतोय. सूर्यकांत कदमने आपला पहिला डाव खेळला आहे त्याने श्रीकांतला गायब केलय. अहिल्याला घरावरचा धोका समजतो. अहिल्या समोर सूर्यकांत एक करार ठेवतो. काय आहे तो करार ? अहिल्या समोर हे कोणतं नवं संकट येणार आहे? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: विकेंडला दिसला 'श्रीकांत' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, तीन दिवसात सिनेमाने कमावले इतके कोटी

भरत जाधव यांच्या कामाविषयी

अभिनेते भरत जाधव हे नुकताच 'श्रीकांत' या बॉलिवूड चित्रपटात न्याधिशाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्यांचा हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. त्यानंतर ते 'हसताय ना? हसायला पाहिजे' या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून कायम दिसत आहेत. आता त्यांची पारु मालिकेत एण्ट्री झाली आहे. भरत जाधव यांना मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Whats_app_banner