मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाडी तुटली अन् पायजामा खाली आला! अभिनेत्याचा हा भन्नाट किस्सा ऐकाच!

नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाडी तुटली अन् पायजामा खाली आला! अभिनेत्याचा हा भन्नाट किस्सा ऐकाच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 06, 2024 09:45 AM IST

नाटकाच्या दरम्यान अनेक मजेदार किस्से घडतच असतात. नाटकाच्या दरम्यान येणाऱ्या या अडचणींवर मात करूनच कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात.

नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाडी तुटली अन् पायजामा खाली आला! अभिनेत्याचा हा भन्नाट किस्सा ऐकाच!
नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाडी तुटली अन् पायजामा खाली आला! अभिनेत्याचा हा भन्नाट किस्सा ऐकाच!

‘झी नाट्य गौरव’च्या निमित्ताने प्रेक्षकांना नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांकडून विविध गंमतीजमती ऐकायला मिळत आहेत. लवकरच हा सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वी या सोहळ्यातील काही खास किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक किस्सा आता चांगला चर्चेत आला आहे. यात अभिनेते अविनाश नारकर यांनी त्यांच्या एका नाटकाची आणि त्या नाटकातल्या सहकलाकाराची एक गंमत सांगितली आहे. अविनाश नारकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट गाजवले. रंगभूमीवर त्यांनी केलेली ऐतिहासिक नाटकातील भूमिका तुफान गाजली होती. या नाटकात त्यांच्याबरोबर एक गमतीशीर प्रसंग घडला होता, जो आठवला की त्यांना आजही हसायला येते.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेते अविनाश नारकर यांनी हाच एक प्रसंग आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. अविनाश नारकर म्हणाले की, ‘त्यावेळी आम्ही ‘रणांगण’ नावाचे नाटक करत होतो. त्या नाटकाच्या वेळी एक इतका मजेशीर किस्सा घडला की, जो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. या नाटकाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिर येथे सुरू होता. या नाटकात एक सीन असा होता ज्यात भाऊसाहेब पेशवे उत्तर मोहिमेच्या मोहिमेचा विडा उचलतात. त्या क्षणी रघुनाथराव लेखणी मोडतात आणि म्हणतात की, हा विडा मी उचलला. हा डायलॉग झाल्यानंतर मी मंचावर फिरायचं आणि स्टेजच्यासमोर येऊन सिंहासनावर बसलेल्या नानासाहेब पेशव्यांकडे विडा घेऊन हात वर उचालायचा आणि मोहीम जाहीर करायची. त्यानंतर नानासाहेब सिंहासनावर उठून तलवार घेऊन माझ्या दिशेने यायचे आणि माझ्या हाती तलवार देऊन मोहीम फत्ते करायची असं म्हणायचे. यानंतर चालत जाताना गोपिकाबाई थांबवायच्या, असा हा एकंदरीत सीन होता.

धमाल होणार; पुन्हा एकदा ‘फुलाला सुगंध माती’चा फेम समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरीची जोडी जमणार!

का आत गेले नानासाहेब?

पुढे, गंमत सांगताना अविनाश नारकर म्हणाले की, ‘असाच हा प्रयोग सुरू होता आणि या प्रयोगाच्या दरम्यान अचानक नानासाहेब माझ्या दिशेने पटपट चालत आले. मला गच्च धरून त्यांनी माझ्या हातात तलवार दिली. पण, त्यावेळी मी मंचावर चाललो नाही. मी जायच्याऐवजी ते स्वतःच चालत गेले आणि संपूर्ण सीन करून मी पण त्यांच्या मागे विंगेत गेलो. आता हे अचानक सीनमधूनच आत कसे काय निघून गेले?, असा प्रश्न मला पडला होता. म्हणून, मी आत जाऊन त्यांना विचारलं नक्की काय झालं?’

तेरी झलक अशरफी... ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का? नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

किस्सा आठवून हसतात अविनाश नारकर!

‘त्यावेळी ते उठले आणि म्हणाले माफ करा. पण, काय सांगू... मी जेव्हा सिंहासनावरून उठलो, तेव्हा माझ्या पायजाम्याची नाडी तुटली आणि पायजामा खाली सरकू लागला होता. पण, नानासाहेब पेशव्यांचा अंगारखा घेरदार असल्याने पायजामा खाली आला हे कुणाच्या लक्षात आलं नाही आणि म्हणूनच मी फक्त आतमध्ये निघून आलो’, हा किस्सा सांगताना आजही अविनाश नारकर खळखळून हसतात. नाटकाच्या दरम्यान असे अनेक मजेदार किस्से घडतच असतात. नाटकाच्या दरम्यान येणाऱ्या या अडचणींवर मात करूनच कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असतात.

IPL_Entry_Point