मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ayodhya Pran Pratishtha: निमंत्रण मिळूनही अक्षय कुमार अयोध्येला जाणार नाही! नेमकं कारण काय?

Ayodhya Pran Pratishtha: निमंत्रण मिळूनही अक्षय कुमार अयोध्येला जाणार नाही! नेमकं कारण काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2024 12:29 PM IST

Akshay Kumar Will Not Attend Pran Pratishtha: मनोरंजन विश्वातील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमारलाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अभिनेता या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये.

Actor Akshay Kumar Will Not Attend Pran Pratishtha
Actor Akshay Kumar Will Not Attend Pran Pratishtha

Akshay Kumar Will Not Attend Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरात आजच्या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला याची देही याची डोळा अनुभवण्याचा मान काही खास लोकांना मिळाला आहे. या भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन, कंगना रनौत, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, अभिषेक यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्येत पोहोचले आहेत. मात्र, राम मंदिराच्या उभारणीसाठी करोडोंची देणगी देणारा अक्षय कुमार निमंत्रण मिळून देखील या सोहळ्यासाठी अयोध्येत जाणार नाहीये.

मनोरंजन विश्वातील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमारलाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अभिनेता या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या आयोजकांना आधीच याची कल्पना दिली होती. आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलेल्या तारखांमुळे तो कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीये. अभिनेता अक्षय कुमार सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नुकताच अक्षय कुमार याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफसह अक्षय कुमारने चाहत्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय म्हणाला, ‘हॅलो, मी अक्षय कुमार आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र टायगर श्रॉफ देखील आहे आणि आम्हा दोघांकडून तुम्हा सर्वांना जय श्री राम. जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात, त्यांच्या घरी येत आहेत.’

पुढे अभिनेता टायगर श्रॉफ म्हणतो की, 'आपण सगळ्यांनीच लहानपणापासून याबद्दल खूप काही ऐकले आहे. परंतु, आजचा हा दिवस पाहणे आणि हा खास क्षण जगणे खूप मोठी गोष्ट आहे. आपण सगळेच आता त्या क्षणाची वाट पाहत आहोत, जेव्हा लक्ष दिव्यांच्या प्रकाशात आपण प्रभू श्रीरामाचा उत्सव साजरा करू’. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'श्री राम प्राण प्रतिष्ठेच्या या शुभदिनी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय श्री राम.'

WhatsApp channel