मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

Mahesh Manjrekar: 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शूटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 29, 2023 01:21 PM IST

Accident on Vedat Marathe Veer Daudale Saat Set: काही दिवसांपूर्वी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या सेटवर एक मोठा अपघात झाला होता. एक १९ वर्षीय तरुण दरीत कोसळला होता. आता त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Vedat Marathe Veer Daudale Saat
Vedat Marathe Veer Daudale Saat

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून इतिहासातील एक सुवर्णपान उलगडलं जाणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या सेटवरून आता एक वाईट बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शुटिंगदरम्यान दरीत कोसळलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळगडावर सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटो काढत असताना पन्हाळगडावरील सज्जा कोटीवरून एक तरुण दरीत कोसळला. सेटवरील ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. त्यानंतर तत्काळ बचावकार्य राबवून जखमी तरुण नागेश तरडेला दरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, आज त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात'चे चित्रीकरण सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात स्वतःचे फोटो काढून घेत होता. यावेळी तो फोटो काढण्यासाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. मात्र, फोटो काढत असतानाच पाय घसरून तो दरीत पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. आता त्याचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान उलगडलं जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सात शूरवीर मावळ्यांची कथा पाहायला मिळणार आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

IPL_Entry_Point