Yash Birthday Accident: ‘केजीएफ’ स्टार यशचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?-accident happened on superstar yash birthday 3 fans died due to electric shock ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Yash Birthday Accident: ‘केजीएफ’ स्टार यशचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

Yash Birthday Accident: ‘केजीएफ’ स्टार यशचा वाढदिवस साजरा करणाऱ्या तीन चाहत्यांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

Jan 09, 2024 01:29 PM IST

Accident On Yash Birthday: यशचा वाढदिवसा साजरा करत असताना त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.

Rocky Bhai AKA Yash
Rocky Bhai AKA Yash (HT)

Accident On Yash Birthday: ‘केजीएफ’ फेम कन्नड सुपरस्टार यश याने काल (८ जानेवारी) रोजी आपला ३८वा वाढदिवस साजरा केला. कालचा दिवस यासासाठी खास असला तरी, त्याच्या चाहत्यांसाठी मात्र हा दिवस काळाचा घाला घालणारा ठरला. यशच्या चाहत्यांना त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा होता. मात्र, चाहत्यांच्या या आनंदावर एका अपघातामुळे विरजण पडले आहे. यशचा वाढदिवसा साजरा करत असताना त्याच्या तीन चाहत्यांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. विजयचे चाहते विजेच्या खांबावर चढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावत असताना हा अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच यश देखील अस्वस्थ झाला. यशला इतके दुःख झाले की, तो वाढदिवस थेट कर्नाटकातील हुबळी येथे मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला.

नुकताच एएनआयने यशचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यश अपघातात जखमी झालेल्या चाहत्यांना आणि तीन मृत चाहत्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रवाना झाला आहे. यशने या मृत चाहत्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसतय की, कर्नाटकात पोहोचलेल्या यशच्या कारला लोकांनी घेराव घातला आहे.

Rashmika-Vijay Engagement: रश्मिकाच्या प्रेमात आकंठ बुडाला विजय देवरकोंडा! ‘या’ दिवशी करणार साखरपुडा?

मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर यशने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपलं दुःख व्यक्त करताना यश म्हणाला की, असा अपघात होईल, अशी अपेक्षाही त्याने कधी केली नव्हती. यावेळी चाहत्यांना आवाहन करताना यश म्हणाला की, त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती जबाबदार असणे अधिक आवश्यक आहे. याच कारणामुळे आपण आपला वाढदिवस कधीही साजरा करत नाही, असे देखील त्याने म्हटले.

अभिनेता यश हा दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या 'केजीएफ चॅप्टर: २' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता यश लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या 'टॉक्सिक' या चित्रपटात दिसणार आहे. यशचा हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विभाग