राजवीर आणि मयूरीचा पार पडणार लग्नसोहळा! 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत रंजक वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राजवीर आणि मयूरीचा पार पडणार लग्नसोहळा! 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत रंजक वळण

राजवीर आणि मयूरीचा पार पडणार लग्नसोहळा! 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 28, 2024 05:23 PM IST

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या सोनी वाहिनीवरील मालिकेत आता रंजक वळण आले आहे. या मालिकेत आता राजवीर आणि मयूरीची लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.

abol pritichi ajab kahani
abol pritichi ajab kahani

सोनी मराठी वाहिनीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा 'ड्रीम बॉय' बनलाय. पण या 'ड्रीम बॉय'ची 'ड्रीम गर्ल' अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती.

राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे.

यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत. त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

राजवीर आणि मयूरीचा लग्नसोहळा

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. 'तू भेटशी नव्याने' मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.

मयूरी दोन्ही भूमिका कशा निभवणार?

आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील.
वाचा: 'अमर फोटो स्टुडिओ'नंतर सखी-सुव्रत पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या नाटकाची घोषणा!

आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या नात्याला नवे वळण

लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल. 'अबोल प्रीतीची अजब काहाणी' या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

Whats_app_banner