Abhishek Kumar: अजूनही ईशा मालवीयावर प्रेम आहे का? ‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक कुमारने केला खुलासा-abhishek kumar bigg boss 17 abhishek kumar talks about his relationship with isha malviya ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhishek Kumar: अजूनही ईशा मालवीयावर प्रेम आहे का? ‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक कुमारने केला खुलासा

Abhishek Kumar: अजूनही ईशा मालवीयावर प्रेम आहे का? ‘बिग बॉस १७’च्या ग्रँड फिनालेनंतर अभिषेक कुमारने केला खुलासा

Jan 29, 2024 02:32 PM IST

Abhishek Kumar Bigg Boss 17: अभिषेक कुमार ‘बिग बॉस सीझन १७’चा पहिला उपविजेता ठरला आहे. यानंतर त्याने आता ईशासोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Abhishek Kumar Bigg Boss 17
Abhishek Kumar Bigg Boss 17

Abhishek Kumar Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'च्या थप्पडकांडमुळे मोठा वाद झाल्यानंतर देखील अभिषेक कुमार या सीझनचा उपविजेता ठरला. ‘बिग बॉस १७’च्या घरात अभिनेत्री ईशा मालवीयसोबतचे त्याचे रिलेशनशिप संपूर्ण सीझनमध्ये चर्चेत रहिले आहे. मात्र, अभिषेकने आपल्या रिलेशनशिपच्या चर्चांचा खेळ म्हणून वापर करण्यास नकार दिला होता. त्याने आपण या नात्यातून आता पुढे निघून गेल्याचे म्हटले होते. आता अभिषेक कुमार ‘बिग बॉस सीझन १७’चा पहिला उपविजेता ठरला आहे. यानंतर त्याने आता ईशासोबतच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

थप्पडकांडमुळे अभिषेकला ग्रँड फिनालेमध्ये आणू नये, असे अनेकांचे मत होते. तर, त्याला उपविजेता ठरवल्यानंतर आता त्याच्यावर टीका देखील होत आहे. तर, काही लोकांनी त्याचे समर्थन देखील केले आहे. परंतु, अभिषेकने गेले काही आठवडे चांगला खेळ केला आणि गेल्या काही आठवड्यात तो खूप प्रसिद्ध देखील झाला. शोमधील त्याच्या प्रवासात एक गोष्ट कायमचर्चेत राहिली, ती म्हणजे ईशा मालवीयसोबतचे त्याचे नाते.

Viral Video: चाहत्यांचे प्रेम कार्तिक आर्यनला पडले भारी! बॅरिकेड्स तुटले अन्...; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ बघाच

सीझनच्या सुरुवातीपासूनच अभिषेकने ईशावरील जाहीर करण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांना हा त्याच्या खेळाचा भाग वाटत होता. मात्र, आता शोच्या ग्रँड फिनालेनंतर एका मुलाखतीत, जेव्हा त्याला या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मला कधीही ईशाचं नाव घेऊन कोणताही खेळ खेळायचा नव्हता. या शोमध्ये माझे इतरही अनेक मित्रमैत्रिणी होते. लोकांनी मला जवळून पाहिले आहे. त्यामुळे मी तिच्या नावाचा कधीच वापर केला नाही.’

ईशासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक कुमार म्हणाला की, 'तो त्याच्या या पूर्वीच्या नात्यापासून आता खूप पुढे निघून गेला आहे आणि भविष्यात त्याला ईशासारख्या व्यक्तीसोबत राहायला आवडेल.’ यावेळी त्याला विचारण्यात आले की, याचा अर्थ तो अजूनही ईशावर प्रेम करतो का? तेव्हा त्याने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, 'आता हा शो संपला असल्याने मला ईशाबद्दल इतर काहीही बोलायला आवडणार नाही. मी एवढेच म्हणेन की, हे आता घडून गेले आहे आणि ईशाबद्दल कोणताही प्रश्न विचारू नका. मी यापुढे तिच्या संपर्कात राहणार नाही, या शोमध्ये येण्यापूर्वी मी एक वर्ष तिच्या संपर्कात नव्हतो.’

विभाग