Abhishek Bachchan Viral Video: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून अशा बातम्या येत आहेत की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नाही. असे म्हटले जात आहे की, हे जोडपे घटस्फोट घेऊ शकते. सध्याच्या काळात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन एकत्र दिसत नसले, तरी घटस्फोटाच्या वृत्तावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन स्वतःच्या आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाबद्दल बोलत आहे. जाणून घेऊया काय आहे अभिषेक बच्चनच्या या व्हिडीओ मागचे सत्य...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या विभक्त झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर नुकताच अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतय अभिषेक बच्चन म्हणत आहे की, 'ऐश्वर्या आणि मी जुलैमध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आराध्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’ मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेबद्दल बोलायचे झाले, तर याला डीपफेक म्हटले जात आहे.
अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ खोटा असून, एआयच्या मदतीने बनवण्यात आला आहे. नीट पाहिल्यास लक्षात येईल की, यातील व्हिडीओ आणि आवाज अजिबात जुळत नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स चांगलेच संतापले आहेत आणि असे डीपफेक व्हिडीओ बंद करण्याची मागणी लोक करत आहेत. मात्र, सुरुवातील हा व्हिडीओ पाहून काही चाहत्यांना जोरदार धक्का देखील बसला होता. खरंच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला की, काय असे सगळ्यांनाच वाटत होते.
गेल्या महिन्यात जुलैमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभात अमिताभ बच्चन कुटुंबासह पोहोचले होते. त्याचवेळी ऐश्वर्या राय बच्चन, मुलगी आराध्या बच्चनसोबत पोहोचली होती. अशातच ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबासोबत कोणत्याच कार्यक्रमांमध्ये दिसलेली नाही.