Viral Video : अफेअरच्या चर्चा असलेल्या अभिनेत्रीसमोरच अभिषेक बच्चनने केले पत्नी ऐश्वर्याचे कौतुक!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video : अफेअरच्या चर्चा असलेल्या अभिनेत्रीसमोरच अभिषेक बच्चनने केले पत्नी ऐश्वर्याचे कौतुक!

Viral Video : अफेअरच्या चर्चा असलेल्या अभिनेत्रीसमोरच अभिषेक बच्चनने केले पत्नी ऐश्वर्याचे कौतुक!

Oct 22, 2024 11:23 AM IST

Abhishek Bachchan Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसला आहे.

Abhishek Bachchan Viral Video
Abhishek Bachchan Viral Video

Abhishek Bachchan Viral Video : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या हे दोन्ही स्टार्स यावर मौन बाळगत असून, अशा अफवांना ते त्यांच्या कृतीतूनच प्रत्युत्तर देत आहेत. २००७मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही मुलगी आराध्याचे पालक झाले. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. दोघांनीही अनेक ठिकाणी एकमेकांना साथ दिली. कधी ते एकत्र धमाल करताना दिसले, तर कधी सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांचे कौतुक करताना दिसले. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिषेक बच्चन एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसला आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री निम्रत कौर दिसत आहे. हा व्हिडीओ 'दसवी' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा आहे. या चित्रपटात निम्रत कौर आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे प्रमोशन करताना अभिषेकने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, 'माझी पत्नी सगळ्या बाबतीत कमालीची आहे. ती नेहमीच माझ्यासाठी एक मोठा भावनिक आधार म्हणून उभी राहिली आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब भाग्यवान आहे. ऐश्वर्यासारखी जोडीदार असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती स्वतःसुद्धा या इंडस्ट्रीत आहे. तिला काम समजते. हे काम ती माझ्यापेक्षा थोडा काळ आधीपासून करतेय. त्यामुळे तिला जग माहीत आहे. या सगळ्यातून ती गेली आहे. म्हणून तिला या सगळ्यात मला कशी साथ द्यायची, हे माहीत आहे.’

निम्रत झाली चकित!

या संपूर्ण संभाषणादरम्यान, निम्रत कौर अभिषेकचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती आणि त्याच्याशी सहमत होतानाही दिसली. याच संभाषणात अभिषेक बच्चन ऐश्वर्याबद्दल बोलताना पुढे म्हणतो की, 'मी नेहमीच पाहिलं आहे की, ती एक अशी व्यक्ती आहे, जिने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगांवरही मोठ्या सन्मानाने आणि सभ्यतेने मात केली आहे. त्याच्या या गुणवत्तेचे मला खरोखर कौतुक वाटते. ती कधीच स्वतःचा संयम सोडत नाही. आजवर मी तिला चिडलेलं पाहिलेलं नाही.’

अफेअरच्या चर्चा

सध्या सोशल मीडियावर अशा अफवांना उधाण आलंय की, अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात निम्रत कौरमुळे फूट पडली आहे. दोघांमधील मतभेदाचे कारण निम्रत कौर असल्याचे म्हटले जात आहे. 'दसवी'च्या वेळी दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे म्हटले जात आहे. यावर अद्याप कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Whats_app_banner