Abhishek Bachchan Viral Video: अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. बच्चन कुटुंबीय किंवा ऐश्वर्याकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही, तरीही गॉसिप मार्केटमध्ये या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, जेव्हा जेव्हा ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन बाहेर पडतात आणि कॅमेरासमोर स्पॉट होतात, तेव्हा लोक त्यांच्या व्हिडिओवर वाईट कमेंट करण्यापासून परावृत्त होत नाहीत. आता एका नव्या क्लिपमध्ये अभिषेक बच्चन आई आणि बहिणीसोबत एअरपोर्टवर दिसला आहे. त्याने हात जोडून पापाराझींना नमस्कार केला.
आता ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यावर लोकांनी पुन्हा एकदा या कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अभिषेकची बहीण श्वेतासाठी सर्वाधिक वाईट कमेंट्स लिहिल्या जात आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय गेल्या काही काळापासून एकत्र दिसले नाहीत, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात खळबळ उडाली आहे. काही काळापूर्वी अभिषेकच्या हातात लग्नाची अंगठी दिसली नव्हती, तेव्हाही लोक घटस्फोटाबाबत अंदाज बांधू लागले होते. आता बच्चन कुटुंबाच्या एका व्हिडिओवर लोकांनी अतिशय वाईट कमेंट केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन, अभिषेक आणि श्वेता विमानतळावर एकत्र दिसत आहेत.
या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं की, ‘नंदेची एन्ट्री, सुनेचं एक्झिट... घरोघरी मातीच्या चुली.’ आणखी एकाने लिहिले की, ‘आराध्याची आत्या सर्वांच्या आत्सायारखी कलेशी झाली.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘ऐश्वर्या आणि आराध्याशिवाय बच्चन कुटुंब अपूर्ण आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘अभिषेक त्याच्या आई आणि बहीणसोबत असतो, तर त्याची पत्नी आणि मुलगी एकटेच प्रवास करतात.’ एकाने लिहिले की, ‘बॉलिवूडमध्ये देओल कुटुंब सर्वोत्कृष्ट आहे.’
या व्हिडिओ बच्चन कुटुंबाच्या समर्थनार्थ काही कमेंट्सही येत आहेत. एकाने लिहिले की, 'तुम्ही पुन्हा एकदा ठरवले आहे की, कोणाला दोष द्यायचा, जसे तुम्ही त्यांच्यासोबत राहता आणि सत्य केवळ तुम्हालाच माहित आहे. ऐश्वर्याला आपल्या मुलीला त्यांच्यापासून दूर ठेवायचं नाही, हे तुम्हाला कसं कळणार? आपण सर्व जण ऐश्वर्यावर प्रेम करतो परंतु याचा अर्थ असा नाही की, तिचे कुटुंब दोषी आहे.