बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या दोघांचा घटस्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मात्र या अफवांवर अभिषेक किंवा ऐश्वर्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र येताना दिसली नाही. नुकतेच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन घटस्फोटाच्या अफवा सुरु असताना एकत्र दिसले. बच्चन कुटुंबीयांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आराध्या बच्चनच्या धीरूभाई अंबानी या शाळेच्या वार्षिक सोहळ्यातील आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन कारमधून खाली उतरताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. त्याचबरोबर ती सासऱ्यांचा हात पकडताना दिसत आहे.
बच्चन कुटुंबीयांच्या या व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने, 'खोटी भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरु होता' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, 'एकत्र राहणे नेहमीच चांगले असते' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'देव बच्चन कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवो' असे म्हटले आहे. चौथ्या एका यूजरने ऐश्वर्याचे कौतुक केले आहे. 'इतकं सगळं झाल्यानंतरही तिने संसार सांभाळला' असे म्हटले आहे.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
अनंत अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत दिसली नव्हती. अनंत अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मुलीसोबत एकटी आली होती. लग्नाचे फोटो व्हायरल होताच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. तेव्हापासून लोकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली की ऐश्वर्या आणि अभिषेकने घटस्फोट घेतला आहे. मात्र, बच्चन कुटुंबीय, ऐश्वर्या किंवा अभिषेक यांच्याकडून या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
संबंधित बातम्या