मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhishek aishwarya news : अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार? नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण!

Abhishek aishwarya news : अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायला घटस्फोट देणार? नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण!

Jan 26, 2024 10:43 AM IST

Abhishek Bachchan Cryptic Post: पत्नी ऐश्वर्या रायपासून विभक्त झाल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकच्या या पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Abhishek Bachchan Cryptic Post
Abhishek Bachchan Cryptic Post

Abhishek Bachchan Cryptic Post: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहेत. सासू-सासऱ्यांसोबतच्या मतभेदांमुळे ऐश्वर्या सासरचे घर सोडून, तिच्या आईच्या घरी राहात असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान गोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या. मात्र, आराध्यामुळेच अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात घटस्फोट होऊ शकत नाही, असेच म्हटले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा अभिषेक बच्चन याने अशी एक पोस्ट शेअर, ज्यामुळे त्यांचं नातं तुटल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोटाची चर्चा सुरू असताना देखील दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. दरम्यान, आता अभिषेकच्या नव्या पोस्टमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. अभिषेक बच्चनची ही पोस्ट पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेत असून, प्रचंड चर्चेत आहे. अभिषेक बच्चनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ‘अपयशाची भीती तुमची स्वप्ने नष्ट करते आणि अपयशातून शिकूनच पुढे तुमची स्वप्ने पूर्ण होतील.’ एकीकडे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असताना अभिषेकने ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, आता त्याच्या या पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

Fighter Collection Day 1: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी!

पत्नी ऐश्वर्या रायपासून विभक्त झाल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकच्या या पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. अशा चर्चांदरम्यान अभिषेकने अशी पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबत म्हणजेच अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे वेगळी राहत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही या चर्चांदरम्यान बच्चन कुटुंब अनेकदा एकत्र दिसले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या. परंतु, या सगळ्यादरम्यान बच्चन कुटुंब नेहमीच एकत्र दिसले आणि अशा चर्चांना त्यांनी केवळ अफवा असल्याचे दाखवून दिले. मीडिया रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, ऐश्वर्याचे तिची सासू जया बच्चनसोबतचे संबंध चांगले नाहीत. परंतु, अशा अफवा असूनही बच्चन कुटुंब एकत्र दिसले आहे.

WhatsApp channel