Abhishek Bachchan Reaction On Divorce: बॉलिवूडचे प्रसिद्ध कपल अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या जोडप्याबद्दल सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे. असे म्हटले जात आहे की, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी बिनसल्या आहेत. त्यामुळे या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच काय तर, दोन दिवसांपासून अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अभिषेक बच्चन घटस्फोटावर बोलताना दिसला होता. मात्र, हा व्हिडीओ डीपफेक असल्याचे समोर आले होते. मात्र, आता स्वतः अभिषेक बच्चन याने घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूडच्या कॉरीडॉरमध्ये या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत भरपूर अफवा पसरत आहेत. इतकंच नाही तर, जेव्हा अभिषेक बच्चनचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा या चर्चांनी अक्षरशः मर्यादा ओलांडली. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन त्याच्या पत्नीपासून म्हणजेच ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याबद्दल बोलत आहे. यादरम्यान, आता घटस्फोटाच्या अफवा बंद करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अभिषेकचा आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने त्याची एंगेजमेंट रिंग दाखवली आहे.
बॉलिवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर चर्चा केली आणि तो म्हणाला, ‘याबद्दल मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी ही गोष्ट मर्यादेच्या पलीकडे खेचली आहे. तुम्ही असे का करत आहात, तेच मला कळत नाहीये. माफ करा, पण मी अजूनही विवाहित आहे.’ यावेळी अभिषेक बच्चन याने आपली साखरपुड्याची अंगठीही दाखवली. हा व्हिडीओ रविवारी सकाळी सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र, आता तो इन्स्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे. मात्र, ऑनलाईन व्हायरल झालेला हा व्हिडीओ नवीन आहे की, जुना हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, यात अभिषेक पहिल्यांदाच त्याच्या विभक्त होण्याच्या अफवांवर बोलला आहे.
गेल्या महिन्यात जुलैमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभात अमिताभ बच्चन कुटुंबासह पोहोचले होते. त्याचवेळी ऐश्वर्या राय बच्चन, मुलगी आराध्या बच्चनसोबत पोहोचली होती. अशातच ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चन आणि बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबासोबत कोणत्याच कार्यक्रमांमध्ये दिसलेली नाही.