Abhishek Bachchan Post Goes Viral: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहे. अनेकदा या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता अभिषेक बच्चन याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक बच्चन याची ही पोस्ट वाचून आता पुन्हा एकदा अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यावर चर्चा होऊ लागल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिषेक बच्चन याने एक कोट शेअर केला आहे.
काल म्हणजेच २ जानेवारी रोजी अभिषेक बच्चनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘जर तुम्हाला हजारो लोकांसमोर चांगले दिसायचे असेल, तर तुम्हाला हजारो लोकांइतकी मेहनत करावी लागेल.’ त्याच्या या खोचक पोस्टमुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. २००७मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांनी मुलगी आराध्याचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. गेल्या काही काळापासून बच्चन कुटुंबातील कौटुंबिक कलहाच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आला असून, ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचे घर सोडले आहे.
एका नव्या पोस्टमध्ये अभिषेक बच्चनच्या हातात लग्नाची अंगठी न दिसल्याने तो ऐश्वर्यापासून विभक्त झाल्याच्या अफवांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया यूजरने अभिषेक बच्चनचा फोटो शेअर केला होता. त्याचा हा फोटो ओमेगा इव्हेंटमधील, तर दुसरा सॅम बहादूरच्या स्पेशल स्क्रीनिंगचा होता. या फोटोंमध्ये त्याच्या हातात लग्नाची अंगठी दिसली नव्हती. त्यामुळे खरंच दोघे वेगळे झाले असावेत, असे बोलले जात होते.