मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhishek Bachchan Birthday: चित्रपटात येण्यापूर्वी अभिषेक बच्चन होता LIC एजंट? 'या' सिनेमांसाठी गिनीज बुकमध्ये नोंद

Abhishek Bachchan Birthday: चित्रपटात येण्यापूर्वी अभिषेक बच्चन होता LIC एजंट? 'या' सिनेमांसाठी गिनीज बुकमध्ये नोंद

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 07:34 AM IST

Abhishek Bachchan Birthday Special: आज ५ फेब्रुवारी रोजी अभिषेक बच्चनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी खास गोष्टी...

Abhishek Bachchan
Abhishek Bachchan

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा लेक अभिनेता अभिषेक बच्चन हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या वागणूकीमुळे तर कधी आगामी चित्रपटांमुळे. अभिषेक सोशल मीडियावर विशेष चर्चेत असतो. तो ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतो. त्याने ‘रेफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला. मात्र, अभिषेकला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. विशेष म्हणजे कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी करत होता.

स्टार किड असल्याने अभिषेकवर सतत चांगले काम करत राहण्याचे दडपण होते. त्याकाळात अभिषेकने त्याला ऑफर केले गेलेले सगळेच चित्रपट सरसकट केले होते. अशावेळी स्क्रिप्टकडे लक्ष न देणे अभिषेकला करिअरच्या दृष्टिने खूप महागात पडले. यामुळे अभिषेक बच्चनने ४ वर्षात सलग १७ फ्लॉप चित्रपट दिले. २००४मध्ये अभिषेक बच्चनने 'धूम' चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर त्यांनी 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरु' आणि 'दोस्ताना' सारखे सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये डळमळीत झालेले आपले स्थान सावरले.
वाचा: बॉबी देओलने भाचीच्या लग्नात केला 'जमाल कुडू' गाण्यावर डान्स Video Viral

अभिषेकला लहानपणी डिस्लेक्सिया आजार

अभिषेक लहानपणापासून डिस्लेक्सिया होता. डिस्लेक्सिया या आजारात मुलांना लिहिताना, वाचताना आणि इतर गोष्टी करताना अनेक अडथळे येतात. अभिषेकचे शालेय शिक्षण जमनाबाई नरसी स्कूलमधून झाले. त्यानंतर ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात व्यवसाय अभ्यासक्रमासाठी गेले. पण हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले.

पदार्पण करण्यापूर्वी LIC एजंट

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक एक LIC एजंट म्हणून काम करत होता. खरं तर ही गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. पण, अभिषेकने एका एलआयसी एजंटचंदेखील काम केलं आहे. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे त्याची पावले कलाविश्वाकडे वळली. अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. ‘दिल्ली ६’च्या दरम्यान तब्बल १२ तासांहून अधिक वेळासाठी पब्लिक अपियरंस आणि ‘पा’ चित्रपटातील रिव्हर्स भूमिकेमुळे अभिषेकचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले होते.

WhatsApp channel

विभाग