Abhishek Bachchan Praises Wife : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिनेता अभिषेक बच्चन याचा 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट एका धाडसी बापाची कहाणी सांगणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेकने मुलांच्या आयुष्यातील त्यांच्या आई आणि वडिलांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. यावेळी त्याने आई जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्याचे कौतुक केले. वडील मुलांसाठी खूप काही करतात, पण त्या गोष्टी कशा व्यक्त कराव्यात हे त्यांना कळत नाही, असेही तो यावेळी म्हणाला.
अभिषेकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नसला, तरी लोक त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'द हिंदू'शी बोलताना त्याने आई जया बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या रायचं कौतुक केलं. तो म्हणाला, ‘माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने अभिनय करणं बंद केलं. कारण तिला आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. बाबांचे आमच्या जवळ नसणे आम्हाला कधीच फारसे भासू दिले नाही. आम्हाला हेच वाटायचं की, बाबा रात्री काम आटोपून घरी येतात.’
अभिषेक बऱ्याचं दिवसांनी ऐश्वर्याचं नाव घेऊन काही बोलला आहे. ऐश्वर्याचं कौतुक करताना अभिषेक म्हणाला की, ‘मी माझ्या घरी खूप नशीबवान आहे. मी बाहेर जाऊन चित्रपट करू शकलो, कारण मला माहित आहे की, ऐश्वर्या घरी आराध्यासोबत आहे. त्याबद्दल मी तिचा खूप आभारी आहे. पण, मुलं या गोष्टीकडे असंच पाहत असतील, असं मला वाटत नाही. ते तुमच्याकडे तिसरी व्यक्ती म्हणून नव्हे तर पहिली व्यक्ती म्हणून पाहतात.’
अभिषेक म्हणाला, ‘एक पालक म्हणून तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. मुलांसाठी तुम्ही एका पायाने डोंगरही चढू शकता. मी हे आई आणि इतर स्त्रियांबद्दल खूप आदराने सांगतो. कारण ते जे करतात ते कोणीही करू शकत नाही. परंतु, वडील त्यांची सगळी कर्तव्ये शांतपणे करतात, कधीच त्याचा दिखावा करत नाहीत. कारण, त्यांना ते कसे व्यक्त करावे हे माहित नसते. पुरुषांच्या बाबतीत हीच कमतरता आहे. वयाबरोबर मुलांना आपले वडील किती कणखर आहेत याची जाणीव होते. पाठीमागे असले तरी, वडील नेहमी मुलांच्या सोबत असतात.’
वडिलांचेही केले कौतुक!
अभिषेकने त्याच्या बालपणाबद्दल बोलताना सांगितले की, लहानपणी मी माझ्या आपल्या वडिलांना अनेक आठवडे बघत देखील नव्हतो. कामात इतके व्यस्त राहिल्यानंतर ते कधीही न चुकता आमच्या बास्केटबॉल फायनलला आठवत नाही की तो चुकला.