काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता गौरव मोरेने एक पोस्ट शेअर केली होती. या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडत असल्याची माहिती दिली होती. अनेकांनी गौरवच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. काही नेटकरी गौरव कार्यक्रम सोडत असल्यामुळे भावूक झाले. पण गौरवच्या या पोस्टवर अभिनेता अभिनय बेर्डेने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले. त्याला या कमेंटमुळे ट्रोलिंगचा सांमना करावा लागला.
गौरवच्या पोस्टवर अभिनयने कमेंट करत शुभेच्छा तर दिल्या. पण एका नेटकऱ्याला ते रुचले नाही. त्याने अभिनयला चांगलेच सुनावले. अभिनयने देखील त्या नेटकऱ्याला चांगलेच उत्तर दिले. तसेच गौरव मोरेने देखील कमेंट करत त्या नेटकऱ्यावर निशाणा साधला.
वाचा: “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, केतकी चितळेची संतप्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडत असल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्याच्या या भावनिक पोस्टवर अभिनेता अभिनय बेर्डेने कमेंट करत 'ऑल द बेस्ट गौऱ्या... लव्ह यु'अशी कमेंट केली. त्यावर गौरवने उत्तर देत गौरवचे आभार देखील मानले. पण एका नेटकऱ्याला ते रुचले नाही. या नेटकऱ्याने कमेंट करत, 'अरे गौरव एक आर्ट कलाकार आहे आणि तू एक फार्ट कलाकार आहेस. गौरव दादा किंवा सर म्हणायचे कष्ट घे' असे म्हटले. ही कमेंट पाहून गौरव आणि अभिनय दोघांनीही संताप व्यक्त केला. दोघांनी त्या ट्रोलरला सुनावले.
वाचा: विकेंडला सिनेमा पाहण्यासाठी जाताय? मग जाणून घ्या 'श्रीकांत'ची पहिल्या दिवसाची कमाई
'विनोदाचा प्रयत्न खूप चांगला होता, पण गौरव आर्ट कलाकार नाही तर ऑलराऊंडर कलाकार आहे' अशी कमेंट अभिनयने केली. त्यानंतर गौरवने ही त्या यूजरला सुनावले. 'आपण कुणाशी बोलतोय याचं जरा भान ठेवा, अभिनय बेर्डे हे एक प्रतिष्ठित नाव आहे त्यामुळे जरा जपून बोला' असे गौरव म्हणाला. या दोन्ही कमेंट पाहिल्यानंतर या यूजरने पुन्हा गौरवला उत्तर दिले.
वाचा: प्रत्येक 'चौका'तला राडा प्रेक्षकांना पाहाता येणार घर बसल्या, जाणून घ्या कधी आणि कुठे?
'तुमचा अभिनय मी तुम्हाला मिशी फुटत असल्यापासून बघतोय. एकांकिका नाटकं वैगरे. तुमच्यापेक्षा वय आणि कारकिर्दीने लहान असलेल्या नवोदित अभिनेत्याने एकेरी आणि उद्धट हाक मारावी हे योग्य नाही. प्रतिष्ठित अभिनेता होण्यासाठी कोणत्याही लेबल आणि गॉडफादरशिवाय तुम्ही कष्ट घेतले आहेत' असे म्हटले. त्यानंतर या यूजरने अभिनयला उत्तर देत, 'हा विनोदाचा प्रयत्न अजिबातच नव्हता. माझा मुद्दा आदर हा आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आपण पाहतो की ते कलाकारांना कसा रिस्पेक्ट देतात ते' असे म्हटले.
संबंधित बातम्या