Shiv jayanti Utsav 2024: राज्यात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली जाते. ठिकठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. त्यामुळे शिवजयंती हा उत्साव प्रत्येकासाठी खास ठरतो. असाच काहीसा ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेसाठी खास ठरला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात देखील नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी शिवरायांप्रती असलेल्या आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी महाराजांची खास वेशभूषा साकारली होती. तसेच साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बिचकुले यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. उत्साहात त्यांनी हातात तलवार घेऊन घोषणाबाजी देखील केली.
वाचा: अमेरिकेत शिवजयंती! अभिनेत्रीने तयार केला बर्फाचा किल्ला
अभिजीत बिचुकलेने माध्यमांशी देखील संवाद साधला. “माझ्यासारख्या अनेक कलाकारांना आपल्याला महाराजांची भूमिका साकारायला मिळावी ही इच्छा असते. त्यांची रंगछटा, वेशभूषा करावी असं वाटतं. शिवरायांचा वैचारिक वारस या नात्याने मी आज महाराजांच्या वेशामध्ये आलो” असे बिचुकले म्हणाला.
अभिजीत बिचुकलेविषयी बोलायचे झाले तर तो ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस हिंदी’च्या १५ व्या सीझनमध्ये देखील सहभागी झाला होता.
संबंधित बातम्या