Abhay Deol: अभिनेता नाही तर पत्रकार असता अभय देओल, या चित्रपटाने बदलले आयुष्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhay Deol: अभिनेता नाही तर पत्रकार असता अभय देओल, या चित्रपटाने बदलले आयुष्य

Abhay Deol: अभिनेता नाही तर पत्रकार असता अभय देओल, या चित्रपटाने बदलले आयुष्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2024 09:31 AM IST

Abhay Deol Birthday: अभयने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तो लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

Abhay Deol
Abhay Deol

Know About Abhay Deol: बॉलिवूड जगतात असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेता अभय देओलबद्दल सांगणार आहोत. अभयचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊया. अभय हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

अभयचा जन्म १५ मार्च १९७६ रोजी मुंबईत झाला. अभय बॉलीवूडमधील प्रसिद्ध देओल कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचे नाव अजित सिंग देओल आणि आईचे नाव उषा देओल आहे. अभय हा चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभय इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्याने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करत चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
वाचा; राम गोपाल वर्माची राजकारणात एण्ट्री, ‘या’ ठिकाणाहून लढणार निवडणूक

अभयने २००५ साली इम्तियाज अली दिग्दर्शित 'सोचा ना था' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभयसोबत आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होती. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. अभयला लोकप्रियता ‘ओये लकी लकी ओये’ या कॉमेडी चित्रपटातून मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का अभयला अभिनेता व्हायचे नव्हते. त्याने करिअरबाबत वेगळा विचार केला होता.
वाचा: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

एका मुलाखतीमध्ये अभयने त्याच्या करिअरविषयी वक्तव्य केले होते. अभिनेता होणे हा अभियच्या करिअरमधला ऑप्शन होता. यासोबतच त्याने पेंटिंग, फिलॉसफी आणि पत्रकारिता करण्याचे पर्याय ठेवले होते. या चौघांपैकी अभयने अभिनयाची निवड केली. शालेय जीवनापासून तो रंगभूमीशी जोडला गेला होता. आपल्या भावांप्रमाणे बॉलीवूडमध्ये यशस्वी ठसा उमटवण्याचे त्याचे एकमेव स्वप्न होते.

Whats_app_banner