काही दिवसांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर ‘अबीर गुलाल’ ही नवी मालिका सुरु झाली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत सतत काही ना काही होताना दिसते. नुकताच श्री आणि अगस्त्यचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. निंबाळकरांच्या घरात श्रीचा गृहप्रवेश झाला असून आता त्यांच्या संसाराची नवी सुरुवात होत आहे. अशातच आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे.
‘अबीर गुलाल’ या मालिकेत अगस्तच्या आईला श्रीसोबत झालेले लग्न मान्य नाही. अगस्त्यच्या आईला हे लग्न मनापासून पटलेलं नसल्याने श्रीला लवकरच या घरातून बाहेर काढेन असं तिच्या मनात आहे. तर दुसरीकडे शुभ्रादेखील श्री आणि अगस्त्यच्या नात्याचा दुरावा आणण्याचा प्रयत्न करू शकते.
श्रीच्या मनात अगस्त्यसाठी प्रेम होतं. पण ती कधी व्यक्तच करू शकली नाही. अगस्त्यने श्रीला आपल्या आयुष्यात एक खूप छान मैत्रीण म्हणून जागा दिलेली होती. पण आता मात्र ही इक्वेशन बदलली आहेत. दोघांचंही एका वेगळ्याच परिस्थित लग्न झालं आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'अबीर गुलाल' मालिकेच्या आगामी भागात अगस्त्य श्रीला प्रॉमिस करतो जे काही घडलं ते आता आपण काही बदलू शकत नाही. पण यापुढे आपल्याला एकमेकांची साथ द्यावी लागेल. अगस्त्य आणि श्री एकमेकांना प्रॉमिस करतात की, "माझ्यामुळे आपल्या आयुष्यात कोणतीही समस्य येणार नाही आणि आपल्या आयुष्यात जितके चॅलेंजेस असतील त्यात एकमेकांची साथ देऊ."
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
श्री आणि अगस्त्य चे खरे आई-वडील कोण हे आता सर्वांसमोर आलं आहे. त्यामुळे शुभ्रा प्रभाकरच्या घरी जाणार की धनाजीच्याच महालात राहणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. प्रभाकरच्या छोट्याशा घरात, त्या लोकांसोबत चाळीत कसं राहायचं अशा अनेक प्रश्नांचं चक्र शुभ्राच्या डोक्यात फिरू लागलं आहे. त्यामुळे आता श्री आणि अगस्त्यला एकमेकांपासून दूर करुन अगस्त्यसोबत संसार थाटून पैसा, प्रॉपर्टी आपल्या नावावक करण्यात ती साध्य होणार का? याकडे मालिकाप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यासाठी प्रेक्षकांना मालिकेचा आगामी भाग पाहावा लागणार.