बॉलिवूड कलाकार हे कायमच सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सतत त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी आणि खासगी आयुष्याविषयी माहिती देण्यासाठी सोशल मीडिया हे माध्यम योग्य ठरताना दिसत आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्याने परदेशात फिरायला गेल्यावर आलेला अनुभव सांगितला आहे. हा अनुभव सांगताने संताप व्यक्त केला आहे.
हा अभिनेता म्हणजे ‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ या मालिकेत काम करणारा अस्ताद काळे आहे. काही मोजक्याच मालिकांमध्ये काम करत अस्तादने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेत्री स्वप्नाली पाटीलशी लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी लग्नाची माहिती दिली. आता अस्तादने स्वप्नीलीच्या वाढदिवशी परदेशात फिरायला जाण्याचे ठरवले. पण एअरलाइन्समुळे आलेल्या अनुभवामुळे त्याने संताप व्यक्त केला आहे.
वाचा : मलायका आणि शुरा पहिल्यांदाच आमनेसामने, अरबाज खानचा व्हिडीओ व्हायरल
स्वप्नालीचा २५ मार्च रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अस्तादने स्वप्नाली फ्रान्सला आयफील टॉवर पाहण्यासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर दोघांनीही एकत्र फिरतानाचे रोमँटिक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. त्यानंतर अस्तादने आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले.
आजवर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर विमान कंपनींकडून आलेल्या अनुभवाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामध्ये अनेकांचे सामान हरवल्याचे पाहायला मिळते. नुकताच अस्तादला देखील असाच अनुभव आला आहे. फ्रान्सला जाण्यासाठी त्याने एका नामांकित विमानकंपनीकडून तिकिटे काढली होती. पण प्रवासादरम्यान, त्याची बॅग हरवली आहे.
वाचा: AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण
“नामांकित विमानकंपनीतून पॅरिस ते मार्सेल हा प्रवास करताना माझी बॅग पॅरिसला एअरक्राफ्टमध्ये चढवलीच नाही. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे” अशी पोस्ट अस्तादने केली. ही पोस्ट शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे. अस्तादच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याला एअरलाइनविरोधात तक्रार करण्यास सांगितले तर काहींनी ट्रेनने जाण्याचा सल्ला दिला आहे.