Anu Aggarwal Photo: ‘आशिकी’ या चित्रपटातून रातोरात बॉलिवूडमध्ये आपलं खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अनु अग्रवाल नेहमीच चर्चेत असते. अनुच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, असे असूनही तिने स्वत:ला कधीच खचू दिले नाही. आपल्या कारकिर्दीत अनु अग्रवाल हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण, जितक्या वेगाने ती यशाच्या शिखरावर पोहोचली, तितक्याच वेगाने ती बॉलिवूडमधून गायब देखील झाली. सध्या अनु सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. वयाच्या ५५व्या वर्षीही अनु तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत असते. दरम्यान, आता अनुचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो पाहून लोक तिला जोरदार ट्रोल करत आहेत.
'आशिकी गर्ल' अनु अग्रवालने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक अतिशय बोल्ड सेमी न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनु आरशासमोर उभी आहे. टॉवेलने तिने आपले शरीर पूर्णपणे झाकले आहे आणि सेल्फी घेत आहे. तसेच तिने तिचे केस जांभळ्या रंगाच्या टॉवेलने गुंडाळले आहेत. या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो खूपच विचित्र दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या फोटोवर कमेंट्स येऊ लागताच अभिनेत्रीने तिचे कमेंट सेक्शन बंद केले आहे.
वयाच्या ५५ व्या वर्षी अनु अग्रवालने असे बोल्ड फोटोशूट केले आहे, जे सध्या सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, काही लोकांना तिचा लूक फारसा आवडला नाही. त्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल करताना तो तिला नवरात्रीच्या काळात अशा गोष्टी न करण्याचा सल्ला देत आहे.
अभिनेत्री अनु अग्रवालचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो समोर येताच चाहत्यांना संताप अनावर झाला आहे. या फोटोवर कमेंट करत लोकांनी तिला खूप ऐकवलं आहे. सध्या अभिनेत्रीने कमेंट सेक्शन बंद करून ठेवलं आहे. मात्र, यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘आजपासून तुमच्याबद्दलचा आदर आणखी थोडा कमी झाला आहे.’ आणखी एका युजरने लिहिलं होतं की, 'नवरात्रीमध्ये कमीत कमी थोडं भान जपायला हवं'. आणखी एक जण म्हणाला की, ‘आता काय गरज आहे, बाय द वे…’ अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत होत्या.
संबंधित बातम्या