Aarya Season 3 Review: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'आर्या ३' आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. तर, यावेळी सुष्मिता देखील चाहत्यांच्या अपेक्षांवर खरी उतरली आहे. आर्या सरीनच्या भूमिकेत सुष्मिता सेन हिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यावेळी प्रेक्षकांना ट्रेलर इतकीच धमाल पाहायला मिळणार आहे. राजकुमारी आर्या आता डॉन आणि माफिया क्वीनच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ती एसीपी खानच्या विरोधात जाऊन लढताना दिसणार आहे.
यावेळी आर्या सरीन मुलांना वाचवण्यासाठी वाघिणीसारखी लढताना दिसणार आहे. तसेच, डॉन बनून संपूर्ण राज्यातील ड्रग्ज फार्म आपल्या नावावर करण्यासाठी ती मर्यादा ओलंडणार आहे. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसणार आहे. यावेळी आर्यने रशियन माफियासोबत १००० कोटी रुपयांची ड्रग्ज निर्यात करण्याचा करार केला आहे. या डीलमध्ये, आर्यला रशियनांकडून धोका ही मिळणार आहे. त्याचवेळी एसीपी खानही तिचा बदला घेण्यासाठी अडचणी निर्माण करणार आहे.
एसीपी खानने आर्याच्या टोळीत अनेक गुप्तहेर पेरले आहेत. तर,आर्यानेही खानच्या विभागात आपली लोकं हेरली आहेत. ड्रग्ज ऑपरेशनच्या सर्वात मोठ्या एपिसोडसोबतच या मालिकेत आर्याच्या मुलाचे प्रेमप्रकरणही पाहायला मिळणार आहे. यामुळे आर्याचा त्रासही वाढणार आहे. आता सूरजही पत्नी नंदिनीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आर्याचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय आर्याला नलिनीचाही सामना करावा लागणार आहे. पुढे काय होते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना या सीरिजच्या पुढच्या सीझनची वाट पाहावी लागणार आहे.
'आर्या ३'मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या कपड्यांपासून, डायलॉग्सपर्यंत सगळंच अप्रतिम आहे. सुष्मिता व्यतिरिक्त इंद्रनील सेनगुप्ता देखील सूरजच्या भूमिकेत चांगले काम करताना दिसला आहे. कमी सीन्स असूनही इला अरुणच्या दमदार अभिनयामुळे ती बाकीच्या स्टार कास्टपेक्षा वेगळी दिसली आहे.
संबंधित बातम्या