गेल्या वर्षी अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होते. मात्र, या कपलने या चर्चांवर प्रतिक्रिया देणे टाळले. तरीही अनेकांनी अभिषेकने ऐश्वर्याला फसवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आराध्याच्या वाढदिवशी हे कपल एकत्र दिसले. त्यानंतर एक-दोन ठिकाणी त्यांनी एकत्र हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला. आता सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकची लेक आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या विमानतळावर उडी मारताना दिसत आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या हे परदेशात गेले होते. ते नुकताच भारतात परत आले आहेत. त्यांचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सर्वात आधी अभिषेक हा विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. त्यापाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्या देखील बाहेर पडत आहेत. पॅपराझींना नववर्षाच्या शुभेच्छा देताना तिघेही हसत हसत कारकडे जाताना दिसले. दरम्यान, आराध्या अचानक उडी मारते. ते पाहून ऐश्वर्या देखील घाबरते. ती आराध्याला काय झालं विचारते. पण आराध्या हसू लागते.
आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने, "ती आनंदी आहे, कारण तिचे आई-वडील पुन्हा एकत्र😍😍😍 आले आहेत," अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, 'आराध्याला किती आनंद झाला आहे. शेवटी तिचे आई-वडील एकत्र आले आहेत' असे म्हटले आहे. तर एका कमेंटमध्ये लिहिले की, 'कारण काहीही असो, मी आराध्यासाठी खूश आहे. तिला तिच्या वडिलांसोबत वेळ घालवायला मिळतो आणि तिला तिच्या आई-वडिलांसोबत बघून खूप छान वाटतं."
वाचा: प्राजक्ता माळी प्रकरणावर अभिनेता गश्मिर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'मला एवढंच माहितीय की...'
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिषेक शूजित सरकार यांच्या आय वॉन्ट टू टॉक (2024) या चित्रपटात मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसला होता. त्यानंतर त्याचा हाऊसफुल 5 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिचा पोन्नयिन सेल्वन (२०२३)मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या पुढच्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या