विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही कायमच लेकीला घेऊन फिरताना दिसते. नुकताच ऐश्वर्याने आराध्यासोबत साऊथ इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स म्हणजेच SIIMAमध्ये पोहोचली होती. दोघीही मायलेकी अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत होत्या. दरम्यान, ऐश्वर्याने भर स्टेजवर जाऊन तिच्या या आनंदात सहभागी झाल्यामुळे आराध्याचे आभार मानले. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी गर्दीत एका व्यक्तीच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून चाहते ऐश्वर्याचे कौतुक करत आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनला मणिरत्नमच्या महाकाव्य 'पोनियिन सेल्वन २' मधील भूमिकेसाठी SIIMA अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर चियान विक्रमने ऐश्वर्याचा हात पकडून तिला स्टेजवरुन खाली आणले. आईच्या विजयाने आराध्याही खूप खूश दिसत होती. आई स्टेजवरून खाली येताच ती धावत तिच्याकडे गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. त्यानंतर मायलेकींमध्ये काही तरी संवाद सुरु असल्याचे पाहायला मिळते.
व्हिडीओमध्ये पुढे ६२ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेता शिवा राजकुमार आणि चियान विक्रमची भेट घेण्यासाठी ऐश्वर्या आराध्याला घेऊन जाते. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिने प्रथम त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. अभिनेता शिवाने देखील आराध्याला आशीवार्द दिले. आराध्याचे असे वागणे पाहून सर्वजण चकीत झाले. ऐश्वर्या देखील आराध्याकडे पाहात राहिली.
आराध्या बच्चनचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स खूप खुश आहेत. केवळ बच्चन कुटुंबच नाही तर ऐश्वर्याने देखील आराध्याला खूप चांगले वळण लावले आहे असे अनेकांनी म्हटले आहे. एका यूजरने आराध्याचा हा व्हिडीओपाहून 'मुलगी तिच्या आईप्रमाणेच आदराने वागते' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, 'आराध्याच्या आईने तिला शिकवले की तिच्यासारख्या इतरांचा आदर कसा करावा' असे म्हणत आराध्याचे कौतुक केले आहे.
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
शिवा राजकुमार साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ते अखेरचा 'जेलर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती.