Aamir Khan Son : आमिर खानचा मुलगा जुनैदलाही डिस्लेक्सिया! ‘तारे जमीम पर’ची स्क्रिप्ट वाचताना झालेले निदान
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan Son : आमिर खानचा मुलगा जुनैदलाही डिस्लेक्सिया! ‘तारे जमीम पर’ची स्क्रिप्ट वाचताना झालेले निदान

Aamir Khan Son : आमिर खानचा मुलगा जुनैदलाही डिस्लेक्सिया! ‘तारे जमीम पर’ची स्क्रिप्ट वाचताना झालेले निदान

Jan 05, 2025 12:47 PM IST

Aamir Khan Son Junaid : आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या डिस्लेक्सियाबद्दल सांगितले. 'तारे जमीन'ची पटकथा वाचल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि आईला या आजाराची माहिती मिळाली होती.

आमिर खान आणि जुनैद खान
आमिर खान आणि जुनैद खान

Aamir Khan Son Junaid Dyslexia : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टशनिस्ट’ म्हणजेच अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान याने गत वर्षी म्हणजेच २०२४मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘महाराज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात आमिर खानच्या मुलाची व्यक्तिरेखा लोकांना चांगलीच आवडली होती. आता जुनैद खानने नुकताच एका मुलाखतीत आपल्या डिस्लेक्सिया या आजाराबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ‘तारे जमीन पर’ची स्क्रिप्ट वाचल्यावर त्याच्या पालकांना डिस्लेक्सियाबद्दल माहिती मिळाली. यावेळी वडील आमीर खान आणि आई रीना दत्ता यांनी त्याला खूप साथ दिली.

'तारे जमीन पर' हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट डिस्लेक्सियाशी झुंजणाऱ्या मुलाची कथा दाखवतो. विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जुनैद खानने खुलासा केला की, 'तारे जमीन पर'ची स्क्रिप्ट ऐकल्यानंतरच त्याचे वडील आमिर आणि आई रीना यांना समजले की, त्यांचा मुलगा देखील डिस्लेक्सियाचा आजार आहे.

आमिर खान जुनैदच्या अभ्यासाबाबत कठोर होता का?

विकी लालवानीशी खास संवाद साधताना जुनैदला असा प्रश्न विचारण्यात आला की, त्याचे आई-वडील त्याच्या अभ्यासाबाबत कठोर होते का? यावर जुनैदने ‘तसे नव्हते’ असे उत्तर दिले. त्यांनी कधीच निकालाचा फारसा विचार केला नसल्याचे देखील तो म्हणाला. जुनैद म्हणाला की, लहानपणी जेव्हा त्याला डिस्लेक्सिया झाल्याचे निदान झाले तेव्हा, तो स्वतः देखील ही गोष्ट लक्षात ठेवायचा, विशेषत: शालेय शिक्षणादरम्यान त्याने यांची काळजी घेतली.

Abhijeet Bhattacharya : 'महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते' म्हणणं अभिजीत भट्टाचार्यला भोवणार?

जुनैद खान डॉक्टरांकडे कधी गेला?

यानंतर जुनैदला विचारण्यात आलं की, त्याची ही अवस्था पाहूनच त्याच्या वडिलांना म्हणजे आमिर खान यांना ‘तारे जमीन पर’ बनवण्याची प्रेरणा मिळाली का? त्यावर जुनैद म्हणाला की, हे अगदी उलट आहे. 'तारे जमीन पर'ची पटकथा ऐकल्यानंतर माझे आई-वडील मला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि मग मला डिस्लेक्सिया झाल्याचे निदान झाले.

जुनैदने सांगितले की, जेव्हा तो सहा-सात वर्षांचा होता, तेव्हा त्याचे आई-वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यावेळी झालेल्या तपासणीत त्याला डिस्लेक्सिया असल्याचे निष्पन्न झाले. फार लवकर कळल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी त्याला खूप आधार मिळाला. वेळीच उपचार मिळाल्यामुळे डिस्लेक्सियाचा त्याच्या बालपणावर फारसा परिणाम झाला नाही. जुनैद खानचा ‘लव्हयापा’ हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात जुनैदसोबत खुशी कपूर दिसणार आहे.

Whats_app_banner