बॉलिवूडमधील स्टार किड्स हे सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. मग ते सुहाना खान असू देत नाही तर इब्राहिम अली खान. एकापाठोपाठ एक स्टारकिड्स इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतीच त्याच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पण यापूर्वी काही बॉलिवूड स्टार्सने कोणत्या चित्रपटातून पदार्पण केले चला जाणून घेऊया...
जुनैदचा 'महाराजा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो एका निर्भीड पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. जुनैदपूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हे कोणते कलाकार आहेत चला जाणून घेऊया...
वाचा: भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल
करण जोहरने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे आपल्याला स्वप्नवत कॉलेजच्या जीवनाची ओळख करून दिली. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. तसेच कलाकारांनाही वेगळी ओळख मिळवून दिली.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट नागराज मंजुळे यांच्या सैराटचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११०.११ कोटींची कमाई केली.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक
अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खानने अभिषेक कपूर दिग्दर्शित केदारनाथ चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली. या चित्रपटात सारासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०२ कोटी रुपयांची कमाई केली. साराला या पहिल्यावहिल्या चित्रपटातूनच ओळख मिळाली.
'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून करण जोहरने चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला लाँच केले. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. चित्रपटाने जवळपास ९८.६ कोटी रुपयांची कमाई केली.
झोया अख्तर दिग्दर्शित आर्चीज या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, जान्हवीची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. र्दैवाने या चित्रपटाने तसेच स्टार किड्सने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली. आता जुनैदचे पदार्पण पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
What are your expectations from Junaid’s debut film Maharaj?