बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने ३ जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज केले. आता ती विधीवत पद्धतीने उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये पुन्हा लग्न करताना दिसत आहे. लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. काल आयराचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यात आमिर खान, किरण राव आणि आझाद खानने गाणे गायल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपूरची एण्ट्री होताना दिसत आहे. आयराने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यावर तिने लाल रंगाचा लांब असा हुडी घातला आहे. तर दुसरीकडे नुपूरने सूट बूट घातल्याचे दिसत आहे. दोघांची जोडी अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: माधुरीचा 'पंचक' हिट की सुपरफ्लॉप? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्सशन
दुसऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान, त्याची दुसरी पूर्व पत्नी किर राव, मुलगा आझाद हे गाणे गाताना दिसत आहेत. त्यांनी तिघांनी मिळून ‘फुलों का तारों का, सबका केहना है, एक हजारो में मेरी बहना है’ हे गाणे गायले आहे. सध्या सगळीकडे आयराच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.
आयरा आणि नुपूरने ३ जानेवारीला मुंबईत लग्न केले. आता ते विधीवत सात फेरे घेणार आहेत. त्यांचा हा शाही लग्नसोहळा ८ ते १० जानेवारी दरम्यान उदयपूरच्या ताज अरावली रिसॉर्टमध्ये सुरु आहे. लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना कोणतीही भेटवस्तू आणू नये, असे सांगण्यात आले आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी रिसॉर्टमधील सर्व १७६ खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. या लग्न सोहळ्यासाठी आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, जुनैद खान, आझाद राव खान, मिथिला पालकर, इम्रान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन हे उदयपूरला पोहोचले आहेत.