मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आमिर खानच्या ‘दंगल’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन

आमिर खानच्या ‘दंगल’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 29, 2024 07:32 AM IST

झायराने सर्वांना आपल्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

आमिर खानच्या ‘दंगल’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
आमिर खानच्या ‘दंगल’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

दंगल’ या चित्रपटात गीता फोगटची बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झायरा वसीम सध्या खूप कठीण टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीचे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. याबाबत झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना सांगितले आहे. झायराने सर्वांना आपल्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले आहे. तिने तिच्या वडिलांसोबतचा तिचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या वडिलांना प्रेमाने चुंबन देताना दिसली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

झायराची पोस्ट

वडिलांसोबतचा फोटो शेअर करत झायराने लिहिले की, 'माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. कृपया त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा. अल्लाहला तिथे त्यांचे रक्षण करण्यास सांगा. आपण सगळेच अल्लाहची मुले आहोत आणि एक दिवस आपल्याला सगळ्यांनाच त्याच्याकडे जायचे आहे.’ दंगल व्यतिरिक्त झायराने आमिरचा चित्रपट ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरचा चित्रपट ‘द स्काय इज पिंक’मध्ये देखील काम केले आहे.

झायरा ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे!

अभिनेत्री झायरा वसीमला ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही देण्यात आला आहे. याबाबत बोलताना झायराने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याचे तिच्या वडिलांना माहित नव्हते. वडिलांना राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी तिला २ तास लागले होते, असेगी ती गंमतीत म्हणाली होती. त्यांना ही फार मोठी गोष्ट वाटत नव्हती. पण, जेव्हा तिला हा पुरस्कार मिळाला, तेव्हा तिच्या पालकांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटला होता.

अभिरामच्या लग्नात कालिंदी घालणार मोठा गोंधळ! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दिसणार लग्नाची धामधूम

पुरस्काराच्या घोषणेचा मजेशीर किस्सा सांगताना झायराने सांगितले होते की, ‘जेव्हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी झोपले होते आणि जेव्हा मी २ वाजता उठून फोन तपासला, तेव्हा मला माझ्या मित्रांचे ३० मिस्ड कॉल्स फोनवर होते. कुटुंबाकडून अनेक अभिनंदनाचे मेसेज आले. मला माझ्या चुलत भावाचा मेसेज आला की, तू मला पुरस्कार मिळाला, हे सांगितलं नाहीस. मी म्हणाले कोणता पुरस्कार? यानंतर मला बातमीवरून कळले, पण तोपर्यंत मलाही या पुरस्काराबाबत माहिती नव्हती. हा एक मोठा पुरस्कार आहे हे मला माहीत होतं, पण तो कसा आणि कोणी दिला हे मला माहीत नव्हतं.’

झायराने घेतली अभिनयातून निवृत्ती

मात्र, अवघे ३ चित्रपट केल्यानंतर झायरा वसीमने २०१९मध्ये चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. धर्माच्या मार्गावर चालून अल्लाहची आणि लोकांची सेवा करायची असल्याचे म्हणत, तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग