बॉलिवूड कलाकार हे धूम्रपान आणि मद्यपान करतात हे जगजाहीर आहे. पण काही कलाकार अचानक या सवयी सोडताना दिसतात. नुकताच अभिनेता आमिर खानने धूम्रपान सोडल्याची घोषणा केली आहे. त्याने मुलगा जुनैद खानच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँच दरम्यान ही घोषणा केली आहे. पण असे काय झाले की आमिरने अचानक धूम्रपान करणे सोडले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आमिर नेमकं काय म्हणाला...
आमिर खानचा मुलगा जुनैदचा लवकरच 'लव्हयापा' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी आमिरने धूम्रपानाच्या व्यसनातून मुक्त होण्याविषयी खुलासा केला. "मी धूम्रपान सोडले आहे, धूम्रपान ही एक अशी गोष्ट आहे जी मला खूप आवडते. काय बोलू, खरं सांगयचं झालं तर मला खोटं बोलता येत नाही. गेली कित्येक वर्ष मी धूम्रपान करत होतो. पण आता मी पाईप ओढतो. तंबाखू ही मला आवडणारी गोष्ट आहे. हे सर्व आरोग्यासाठी चांगले नाही माहिती असतानाही मी करत होतो. कोणीही धूम्रपान करू नये" असे आमिर म्हणाला.
'ही वाईट सवय मी सोडली आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आणि जे कोणी बघत आहेत किंवा ऐकत आहेत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की कृपया धूम्रपान सोडा. ही चांगली सवय नाही. मला वाटलं की मला नोकरी सोडायची आहे, माझ्या मुलाचं करिअरही सुरू होत आहे. मी मनातल्या मनात एक संकल्प केला. जुनैदचा पुढचा चित्रपट चालला किंवा न चालला, पण मला हे सोडायचे होते. एक बाप म्हणून मला त्याग करायचा होता. विश्वात कुठेतरी काहीतरी होईल अशी आशा आहे. तुम्हीही प्रार्थना करा आणि शुभेच्छाही द्या,' असं आमिर म्हणाला.
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
जुनैदने गेल्या वर्षी नेटफ्लिक्स इंडियाच्या 'महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर आता त्याचा 'लव्हयापा' हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या कंपनीच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात जुनैदसोबत अभिनेत्री खूशी कपूर दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. आमिरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचा लवकरच 'सितारे जमीन पर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या