Aamir Khan: आमिरने भरमांडवात किरण रावला केले किस, अशी होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan: आमिरने भरमांडवात किरण रावला केले किस, अशी होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

Aamir Khan: आमिरने भरमांडवात किरण रावला केले किस, अशी होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2024 08:46 AM IST

Ira and Nupur Wedding: आमिर खानची लाडकी लेक आयरा ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर पूर्व पत्नी किरण रावला किस करताना दिसत आहे.

Aamir Khan
Aamir Khan

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. मुंबईतील ताज लँडमध्ये अतिशय साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामधील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुपूरने हाफ पँट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये आयरासोबत लग्न केले आहे. तर दुसरीकडे भर मंडपात पहिल्या बायकोसमोर दुसऱ्या बायकोला किस केल्याने 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लाइमलाईटमध्ये आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्याची शाळा घेतली आहे.

आयरा आणि नुपूर यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांच्या सह्या झाल्यानंतर तेथे उपस्थित असेलेली मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर येते. खान आणि शिखरे परिवार एकत्र येऊन फोटो काढतात. कौटुंबिक फोटोसाठी आमिर खान, किरण राव आपला मुलगा आजाद, नुपूर शिखरे, नुपूरची आई जुनैद, आयरा खान, आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता एकत्र उभे होते. त्यावेळी आमिर किरण रावच्या जवळ जात संवाद साधतो आणि तिच्या गालावर किस करतो आणि पुन्हा आपल्या पहिल्या पत्नीकडे जातो.
वाचा: सई-सिद्धार्थची आगळी-वेगळी लव्हस्टोरी, “श्रीदेवी प्रसन्न"चा टीझर प्रदर्शित

सध्या सोशल मीडियावर आमिरने किरणला किस करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन किरण आणि आमिरला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने 'आमिर आणि किरणचा घटस्फोट झालाय ना?'असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'हिंमत लागते भावा पहिल्या पत्नीसमोर दुसऱ्या पत्नीला किस करायला, आमिर भाई सलाम' असे म्हटले आहे. तिसऱ्या यूजरने 'घटस्फोटानंतर आमिर असं कसं वागू शकतो?' असा प्रश्न विचारला आहे.

आयरा आणि नुपूरच्या लग्नात आमिरच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी उपस्थित होत्या. आमिरने १९८६मध्ये रीनाशी लग्न केले होते. त्यांना आयरी ही मुलगी आहे. लग्नाच्या १६ वर्षांनंतर ते वेगळे झाले. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००५मध्ये किरण रावशी आमिरने दुसरे लग्न केले. पण त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. २०२१मध्ये ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आहे.

Whats_app_banner