Aamir Khan : आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan : आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या

Aamir Khan : आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या

Feb 02, 2025 10:41 AM IST

Actor Aamir Khan : आमिर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो, पण यावेळी आमिर चर्चेत येण्याचे कारण त्याचे प्रोफेशनल लाईफ नसून, पर्सनल लाईफ आहे.

आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या
आमिर खान पुन्हा प्रेमात पडला? का होतेय अभिनेत्याच्या रिलेशनशिपविषयी चर्चा? जाणून घ्या (PTI)

Aamir Khan New Relationship : बॉलिवूड अभिनेता आमिर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतो. आमिर त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे खूप चर्चेत असतो, पण यावेळी आमिर चर्चेत येण्याचे कारण त्याचे प्रोफेशनल लाईफ नसून, पर्सनल लाईफ आहे. होय, सध्या आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. जाणून घेऊया आमिर का चर्चेत आहे?

आमिरच्या आयुष्यात आली मिस्ट्री गर्ल?

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की,आमिर खान रिलेशनशिपमध्ये आहे आणि हे नाते खूपच गंभीर आहे. आमिरबद्दल ही बातमी कळताच, सर्वजण या अभिनेत्याच्या आयुष्यातील या रहस्यमयी स्त्रीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. आम्ही अशा कोणत्याही अफवांना दुजोरा देत नाही, परंतु या दाव्यांवर विश्वास ठेवला तर आमिर खान रिलेशनशिपमध्ये असल्याचे सगळीकडेच चर्चेत आहे.

आमिर खानची मिस्ट्री वुमन बेंगळुरूची?

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आयुष्यातील ही 'मिस्ट्री वुमन' बेंगळुरूची असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच नाही तर, अलीकडेच आमिरने तिची त्याच्या कुटुंबाशीही ओळख करून दिल्याचं ऐकायला मिळतंय आणि त्यांची ही भेट खूप छान झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय रिपोर्ट्समध्ये आमिरच्या मिस्ट्री वुमनबद्दल तिची प्रायव्हसी लक्षात घेऊन फारशी माहिती देण्यात आलेली नाही.

आमिर खानची नवी गर्लफ्रेंड कोण? सलमान खानच्या प्रश्नाला मुलगा जुनैदने दिलेल्या उत्तराने वेधले लक्ष

आमिर 'लवयापा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त!

इतकंच नाही तर या भेटीनंतर लवकरच आमिर खानच्या मिस्ट्री वुमनचीही झलक समोर येऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. आमिर खानबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान सध्या त्याचा मुलगा जुनैद खानच्या 'लवयापा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा करताना दिसत आहे.

आमिरने दोनदा केले आहे लग्न

आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आमिर खानने याआधी दोन लग्न केले आहेत. आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तसोबत झाले होते. या लग्नापासून आमिरला दोन मुले आहेत, ज्यांची नावे जुनैद आणि आयरा आहेत. त्याचवेळी आमिरने किरण रावसोबत दुसरे लग्न केले होते आणि या लग्नातून आमिर आणि किरणचा मुलगा आझाद आहे. मात्र, आमिरचे दोन्ही लग्न मोडून त्यांचा घटस्फोट झाला.

अफवा खऱ्या की खोट्या?

आता आमिरबद्दल असे बोलले जात आहे की त्याच्या आयुष्यात तिसऱ्यांदा पुन्हा नवीन जोडीदार आली आहे. या अफवांवर आमिरकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आमिरबद्दलच्या या अफवा खऱ्या ठरतात की खोट्या याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Whats_app_banner