Amir Khan: कपाळी टिळा, डोक्यावर टोपी; आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत केली पूजा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amir Khan: कपाळी टिळा, डोक्यावर टोपी; आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत केली पूजा

Amir Khan: कपाळी टिळा, डोक्यावर टोपी; आमिर खानने पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत केली पूजा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 09, 2022 04:05 PM IST

Amir Khan With Ex Wife: आमिर खानचे पूजा करतानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यावर टीका केली आहे.

आमिर खान
आमिर खान (HT)

Amir Khan With Ex Wife: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने पत्नी किरण राव हिला काही दिवसांपूर्वी घटस्फोट दिला. त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनेकांना मनात आजही घर करुन आहे. घटस्फोट घेतल्यानंतरही किरण आणि आमिर एकत्र फिरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर आमिर आणि किरणचा एकत्र पूजा करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

आमिर खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एक पूजा ठेवली होती. या पूजेसाठी आमिरने निळ्या रंगाचे हूडी घातले होते. कपाळाला कुंकवाचा टिळा आणि डोक्यावर टोपी घातली होती. आमिरने त्याच्या प्रोडक्शन हाऊसची पूजा केली. त्यानंतर पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसोबत त्याने आरती केली.

आमिरचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'चे दिग्दर्शक अद्वैत चंदन हे देखील पूजेला उपस्थित होते. त्यांनी आमिर आणि किरणचे एकत्र पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी, '#AmirKhanProdctions' असे कॅप्शन दिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी आमिरवर निशाणा साधल आहे तर काहींना पुन्हा किरण-आमिरला एकत्र पाहून आनंद झाला आहे.

एका यूजरने या फोटोंवर कमेंट करत, 'हे फोटोपाहून मी आनंदी आहे. आमिर खान आणि किरण राव एकत्र पूजा करताना खूप क्यूट दिसत आहेत' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, 'लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्याची कमाल' असे म्हटले आहेत. तर तिसऱ्या एका यूजरने, 'ब्रँड मिळणे बंद झाले तर आता हिंदू असण्याचे नाटक करत आहे' असे म्हणत आमिरला सुनावले आहे.

Whats_app_banner