मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan News: १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर खान-दर्शिल सफारी! नव्या लूकने चाहतेही झाले हैराण

Aamir Khan News: १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर खान-दर्शिल सफारी! नव्या लूकने चाहतेही झाले हैराण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 05, 2024 10:58 AM IST

Aamir Khan Darsheel Safary New Look: दर्शील सफारीने आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला. आता १६ वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत.

Aamir Khan Darsheel Safary New Look
Aamir Khan Darsheel Safary New Look

Aamir Khan Darsheel Safary New Look:तारे जमीन पर’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला होता. या चित्रपटाने सगळ्यांनाच एक नवा संदेश दिला होता. एका ऑटीझमग्रस्त मुलाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला आता १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. १६ वर्षांनंतर आता आमिर खान याने पुन्हा चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘ईशान’ अर्थात अभिनेता दर्शील सफारी याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघांचा नवा लूक शेअर केला आहे. या लूकने आता चाहत्यांना देखील धक्का दिला आहे. दोघे मिळून पुन्हा एकदा काहीतरी धमाकेदार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘तारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ईशान अवस्थी ही भूमिका साकारणारा दर्शील सफारी आणि त्याच्या शिक्षकाची अर्थात निकुंभची भूमिका साकारणाऱ्या आमिर खान यांची जोडी लोकांना खूप आवडली होती. आता आमिर लवकरच 'सीतारे जमीन पर' या नावाने चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकची माहिती समोर आलेली नाही. या दरम्यान, दर्शील सफारीने आमिर खानसोबतचा एक फोटो शेअर केला. आता १६ वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत.

Bhagirathi Missing Movie: महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडणारा ‘भागीरथी मिसिंग’! ‘या’ खास दिवशी होणार रिलीज

आमिर-दर्शील पुन्हा एकत्र दिसणार?

अभिनेता दर्शील सफारीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो दिसत आहेत. यातील पहिला फोटो 'तारे जमीन पर' चित्रपटातील एका सीनचा आहे आणि दुसरा फोटो त्याच्या आगामी प्रोजेक्टचा असू शकतो, असे म्हटले जात आहे. या फोटोमध्ये दोन्ही स्टार्सचा बदललेला भन्नाट लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये आमिर खान काहीसा वयस्कर तर, दर्शील अगदी तरुण दिसत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या नव्या प्रोजेक्टचा खुलासा केलेला नाही.

चाहत्यांच्या उत्साहाला उधाण

दोघांचा हा भन्नाट फोटो शेअर करताना दर्शीलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बूम, आम्ही १६ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहोत. खूप चार्ज वाटतंय. या अनुभवासाठी माझ्या या मार्गदर्शकाला खूप खूप प्रेम.’ दोघांचा हा फोटो पाहिल्यानंतर आमिर आणि दर्शील या दोघांचे चाहते चांगलेच आतुर झाले आहेत.

यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आम्ही देखील यासाठी खूप उत्सुक आहोत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'मला वाटते की, हे खरंच जमिनीवरचे तारे आहेत'. काही दिवसांपूर्वी आमिरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो लवकरच त्याच्या आगामी चित्रपट 'सीतारे जमीन पर'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले, असून वर्षाच्या शेवटी ख्रिसमसपर्यंत तो रिलीज होऊ शकतो.

IPL_Entry_Point

विभाग