Aamir Khan: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का-aamir khan buys new luxury apartment worth over 9 crores in mumbai ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamir Khan: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

Aamir Khan: मुंबईतील पॉश भागात आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 28, 2024 07:43 AM IST

Aamir Khan: आमिर खानने पाली हिल्स परिसरात ही नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याच भागात आमिरची एक जुनी प्रॉपर्टी देखील आहे. पण या नव्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

Aamir Khan: आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट
Aamir Khan: आमिर खानने खरेदी केला नवा फ्लॅट (HT)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्याने आमिर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आता आमिर खानने मुंबईत नवा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आली आहे. त्याच्या या प्लॅटची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसले.

स्क्वेयर यार्ड्स डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने पाली हिल्स परिसरातील बिल्डींगमध्ये एक घर खरेदी केले आहे. या घराची किंमत जवळपास ९.७५ कोटी रुपये आहे. त्याचे हे घर १०२७ क्वेअर फीट आहे. आमिरने २५ जून रोजी हे घर खरेदी केले आहे. या घरासाठी आमिरने ३० हजार रुपये रजिसिट्रेशन फी देण्यात आली असून ५८.५ लाख रुपये स्टँप ड्यूटी भरण्यात आली आहे.
वाचा: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू

कुठे आहे आमिरचे नवे घर

आमिर हा सध्या पाली हिल्स परिसरात राहतो. याच भागात बेला विस्ता नावाची नवी बिल्डींग आहे. या बिल्डींगच्या अप स्केलमध्ये आमिरने हा नवा प्लॅट खरेदी केला आहे. आमिरचा फ्लॅट त्याच्या जुन्या घरापासून किती लांब आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
वाचा: 'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?

आमिर खानच्या मुंबईतील संपत्ती

आमिर खानने पाल हिल्स परिसरातील बेला विस्ता अपार्टमेंट्स आणि मरिना अपार्टमेंट्समध्ये आधीच काही प्लॅट घेऊन ठेवले आहेत. याशिवाय वांद्रे येथे समुद्रकिनारी आमिरचे आलिशान घर आहे. हे घर ५ हजार क्वेअर फूट आहे. या घराचे दोन मजले आहे. घराला एक ओपन एरिया आहे जेथे पार्टी आणि इवेंट्स होतात. २०१३मध्ये आमिरने पाचगणी येथे ७ कोटी रुपयांचा फार्महाऊस खरेदी केला होता. हा फार्महाऊस दोन एकरमध्ये वसलेला आहे.
वाचा: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

आमिरची एकूण संपत्ती

याशिवाय आमिर खानची कमर्शियल प्रॉपर्टी देखील आहे. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे आमिर खानने २२ घरे घेतली आहे. तसेच इतरही काही भागात आमिरची संपत्ती आहे. आमिरच्या एकूण संपत्तीचा आकडा हा १८६२ कोटी रुपये आहे.

Whats_app_banner