मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या पहाण्याची संधी

Aamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या पहाण्याची संधी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 16, 2023 04:44 PM IST

Aamhi Jato Amuchya Gava: ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ हा मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५५ वर्षे उलटली आहे. आता हा सिनेमा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Aamhi Jato Amuchya Gava
Aamhi Jato Amuchya Gava

दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'पावनखिंड', 'झिम्मा', 'चंद्रमुखी', 'दगडी चाळ २', 'बळी', 'कारखानिसांची वारी' अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे ५५ वर्षांपूर्वीचा चिरतरुण चित्रपट 'आम्ही जातो अमुच्या गांवा.'

'आम्ही जातो अमुच्या गांवा' या चित्रपटातील देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, मला हे दत्तगुरु दिसले, हवास मज तू आणि स्वप्नात रंगले मी… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पहाण्याची संधी मिळणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच १८ मेला दुपारी १ वाजता हा सिनेमा प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे.

१९६७ साली रिलीज झालेल्या या सिनेमाला उदंड यश मिळालं. तीन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरात शिरतात. मात्र घरातील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या वागणूकीने त्यांच्यातील माणूसकी जागी होते आणि ते सन्मार्गाला लागतात अशी सिनेमाची कथा. अनेक दिग्गज कलाकार, जगदीश खेबुडकर आणि वंदना विटणकर यांची गाणी आणि सुधीर फडके यांच्या संगीताने या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

IPL_Entry_Point

विभाग