Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काहीना काही घडत असते. गेल्या काही दिवसांपासून तर मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात चढउतार सुरु आहेत. अरुंधती आणि अनिरुद्धचे आयुष्य जर सुखकर झाले तर मग ती कसली. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे. मायाच्या एण्ट्रीने अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. माया आशुतोषच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आता अरुंधतीला देखील चाहूल लागली आहे. तसेच मालिकेच्या वेळेत एक नवी मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार असल्यामुळे ही मालिका बंद होणार की काय अशी चर्चा रंगली होती. आता मालिकेच्या वेळेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे.
आई कुठे काय करते अत्यंत मह्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अरुंधतीने कुटुंबासाठी आपलं सर्वस्व पणाला लावले. तिच्या वाट्याला मात्र नेहमी संघर्षच आला. अनिरुद्धकडून झालेली फसवणूक, २५ वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी शेवट, घटस्फोट आणि आशुतोषसोबत लग्न करुन नव्याने संसार थाटण्याचा घेतलेला निर्णय. अरुंधतीच्या आयुष्यात अनेक सुख-दु:खाचे क्षण आले. मात्र अरुंधती परिस्थितीसमोर कधीही हतबल झाली नाही. दु:ख मागे सारून ती प्रत्येक प्रसंगाशी ताठ मानेने लढली.
वाचा: अभिनेत्याची विंटेज कार चोरीला, व्हिडीओ शेअर करत केली परत करण्याची मागणी
आशुतोषसोबत नव्याने आयुष्य सुरु करुन सुखाचे क्षण अनुभवत असतानाच पुन्हा एकदा नियती अरुंधतीची परिक्षा घेणार आहे. सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानक एका अपघातात आशुतोषचे निधन होणार आहे. अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. या कठीण प्रसंगात अरुंधतीच्या पाठीशी आईच्या मायेने ठामपणे उभी रहाणार आहे अरुंधतीची सासू अर्थात कांचन. सासू कधीच आईची जागा घेऊ शकत नाही असे म्हण्टले जात. मात्र कांचनने उचललेले पाऊल समाजातील अनेक अरुंधतींना नक्कीच नवी उभारी देईल. कांचनच्या साथीने अरुंधती या कठीण प्रसंगाचा सामना कसा करणारा याचा प्रवास आई कुठे काय करते मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
वाचा: लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून प्रकृती खालावली
'आई कुठे काय करते' मालिकेच्या वेळात आता बदल झाला आहे. ही मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. आता या मालिकेच्या वेळेत बदल झाला आहे. मालिका १८ मार्च पासून दुपारी २.३० मिनिटांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: राखी सावंतच्या एक्स-पतीने बांधली लग्नगाठ! पाहा कोण आहे ‘ही’ नवी सुंदरी
संबंधित बातम्या