स्टार प्रवाह वाहिनीवरील एकेकाळी सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख निर्माण झाली होती. टीआरपी यादीमध्ये देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. पण आता या मालिकेतील ट्रॅक प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटत आहे. ही मालिका टीआरपी यादीमध्ये देखील घसरली आहे. अशातच मालिकेत आता एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.
वाचा: "दोन मनाच्या दोन दिशा अन एक हळवी वाट...", ‘अंतरपाट’ मालिकेचे शीर्षकगीत ऐकलेत का?
ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत होती. आता तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. तसेच तो 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार असल्यामुळे सर्वजण त्याला पाहण्यासाठी आतुर आहेत.
वाचा: 'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा
या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणे हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. खरतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. आई कुठे काय करते मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आले आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली. जवळपास ६ वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करत आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडे टेन्शन होते. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसे करुन घेतले. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिले आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे.'
वाचा: नैनाचे सत्य कला आणणार का सर्वांसमोर? 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?
संबंधित बातम्या