मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?

अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 25, 2024 01:33 PM IST

आशुतोषच्या निधनानंतर सुलेखा ताईंनी अरुंधतीला घराबाहेर काढले. त्यानंतर तिने देशमुखांच्या घरी देखील राहण्यास नकार दिला. आता अरुंधती कुठे जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?
अरुंधतीचा देशमुखांच्या घरी राहण्यास नकार, काय असेल तिचे पुढचे पाऊल?

आशुतोषच्या निधनानंतर 'आई कुठे काय करते' मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. सतत अरुंधतीची बाजू मांडणाऱ्या, तिच्या विषयी आशुतोषला चार चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या सुलेखा ताईंचा स्वभाव अचानक बदलला आहे. त्यांनी आशुतोषच्या निधनाला चक्क अरुंधतीला दोषी मानले असून तिला थेट घराबाहेर काढले आहे. नितीनने समजावण्याचा प्रयत्न केला असताना देखील त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

सुलेखा ताईंनी अरुंधतीला बाहेर काढताच अप्पा आणि कांचन आजी तेथे पोहोचतात. ते अरुंधतीला घेऊन घरी येतात. अरुंधतीला धक्का बसलेला असतो. ती काय करते हे तिला कळतच नाही. अप्पा कसेबसे अरुंधतीला घरात आणतात. सर्वजण अरुंधतीला पाहून आनंदी होतात. मात्र, अरुंधतीच्या येण्याने संजनाला असुरक्षित वाटतते. आता पुन्हा अनिरुद्धच्या मनात अरुंधती विषयी भावना निर्माण होणार की काय? असे तिला वाटू लागते. संजना अरुंधतीला घराबाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण कांचन आजी स्पष्टच सांगतात हे घर माझे आहे आणि या घरात कोणाला आणयचे हे मी ठरवणार. ते ऐकून संजनाला धक्का बसतो.
वाचा: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय

दुसरीकडे अरुंधतीची मानसिकता बदलण्याचा सर्वजण प्रयत्न करतात. तिला घरात थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही अरुंधती कोणाचेही ऐकत नाही. ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. अनघा जानकीला अरुंधती समोर आणते आणि तिच्याकडे पाहून थांबण्यास सांगते. आता अरुंधती काय निर्णय घेणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आगामी भागाची वाट पाहात. सुलेखा ताई अरुंधतीचे नाव घरात घेण्यासही नकार देते. आता अरुंधती आशुतोषचा संपूर्ण बिझनेस स्वत:च्या हाती घेऊन आयुष्यात पुढे जाणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point