मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुलेखाताईंनी अरुंधतीला काढले घराबाहेर, 'आई कुठे काय करते'मध्ये आज काय घडणार?

सुलेखाताईंनी अरुंधतीला काढले घराबाहेर, 'आई कुठे काय करते'मध्ये आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 23, 2024 12:48 PM IST

'आई कुठे काय करते' मालिका सध्या अतिशय कंटाळवाणी वाटू लागली आहे. या मालिकेकडे आता प्रेक्षकांनी देखील पाठ फिरवली आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषच्या निधनानंतर सुलेखा ताईंनी अरुंधतीला देखील स्विकारण्यास नकार दिला होता. अरुंधती आशुतोषमुळे माझ्या आयुष्यात आली. आता आशुतोषच माझ्या नाही. त्यामुळे अरुंधतीचा आणि माझा काही संबंध नाही असे सुलेखाताई बोलताना दिसतात. त्यामुळे आता अरुंधती कुठे जाणार असा प्रश्न सर्वांन पडला होता.

'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोष त्याची पूर्ण कंपनी अरुंधतीच्या नावावर करतो. तसेच राहात असलेले घर सुलेखा ताईंना दिले आहे. पण सुलेखा ताईंना हे मान्य नाही. आशुतोषनंतर ती कंपनी नितनने पाहावी असे त्या म्हणाल्या. तसेच राहाते घर विकून त्या आश्रमात रहायला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. हे सगळं ऐकून अरुंधती हट्ट करते तिला सुलेखा ताईंसोबत राहायचे आहे. पण शेवटी सुलेखा ताई घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतात. ते पाहून अरुंधती स्वत: घरातून निघून जाण्याचा निर्णय घेते.
वाचा: मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

अरुंधती केळकरांच्या घराबाहेर पाऊल टाकते तेवढ्यात कोसळते. तिला वाईट वाटते. तेवढ्यात तेथे अप्पा आणि कांचन आजी येतात. ते दोघेही अरुंधतीला सावरताना दिसतात. त्यानंतर कांचन आजी रागाच्या भारात सुलेखा ताईंना ऐकवतात की अरुंधतीची ही आई अजून जिवंत आहे. ते अरुंधतीला घेऊन देशमुखांच्या घरी जातात. अरुंधती अजूनही धक्क्यातच असते.
वाचा: आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

अप्पा आणि आजी अरुंधतीला घेऊन घरी जातात. तिला पाहून सगळ्यांना आनंद होता.संजना मात्र नाराज असते. तिला सतत वाटते की अरुंधती तिची पुन्हा जागा घेणार. अरुंधतीला घरी का आणले असे ती सर्वांना विचारते. तेव्हा कांचन आजी तिला सांगतात की गेली २६ वर्षे ही अरुंधतीची जागा आहे. तुला तिने या घरात जागा करुन दिले. आता मालिकेच्या आगामी भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point