मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay karte: मला वीणावर अविश्वास दाखवायला नको, आशुतोष नितीनला समजावतो

Aai Kuthe Kay karte: मला वीणावर अविश्वास दाखवायला नको, आशुतोष नितीनला समजावतो

Aarti Vilas Borade HT Marathi
May 22, 2023 04:31 PM IST

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. वीणाच्या एण्ट्रीने मालिकेच्या कथानकाने वेगळे वळण घेतले आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री होताच मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

वीणा परत येताच आशुतोष तिच्या वडीलांची कंपनी तिला पुन्हा सोपावतो. त्यासाठी तो नितीनला सगळे पेपर तयार करण्यासाठी. इतके वर्षे आशुतोष ती कंपनी सांभाळत असल्याचे नितीन पेपर बनवतान कंपनीवर आशुतोषचाही अधिकार आहे हे लिहितो. पण जेव्हा आशुतोषला हे कळते तेव्हा त्याला राग येतो. तो नितीनला 'असं करुन मी वीणावर अविश्वास दाखवत आहे असा गैरसमज होऊ नये' असे म्हणतो.

तेवढ्यात वीणा अनिरुद्धसोबत ऑफिसमध्ये येते आणि अविश्वास हा शब्द ऐकते. ती आशुतोषला नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न करते. त्यावर अनिरुद्ध संतापतो. जर घरातले विषय असतील तर मी इथून जातो असे तो सरगळ्यांना सांगतो.

आता वीणा त्या पेपरवर सही करणार का? अनिरुद्धने पेपर वाचून दाखवल्यावर वीणाच्या मनात कोणते प्रश्न येणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग