मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: गौरी करणार लग्न, यशला बसला मोठा धक्का

Aai Kuthe Kay Karte: गौरी करणार लग्न, यशला बसला मोठा धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 20, 2023 03:05 PM IST

Aai Kuthe Kay Karte: यशला मोठा धक्का बसला आहे. तो गौरीला फोन करणार आहे. आता यश गौरीला फोन करुन तिच्याशी काय बोलणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेत घडणाऱ्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. अरुंधती आणि तिच्या मुलांसोबत सतत काही ना काही घटना घडताना दिसत आहेत. आता मालिकेत यशची एक्स गर्लफ्रेंड गौरी लग्न करताना दिसणार आहे. हे ऐकून यशला धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत यश तिला फोन करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अनिश हा यशला भेटण्यासाठी देशमुखांकडे चाललेला असतो. तेवढ्यात रस्त्यात त्याला यश भेटतो. अनिश त्याला थांबवतो आणि काही तरी महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगतो. गौरी सतत यशला फोन करत असते. यश मात्र तिचे फोन घेत नाही. शेवटी ती अनिशला लग्न ठरल्याचे सांगते. अनिश यशला भेटतो तेव्हा सांगतो की गौरी लग्न करणार आहे. ऑस्ट्रेलियामधील एका मुलाशी ती लग्न करणार आहे. लग्नानंतर ती ही परदेशात शिफ्ट होणार आहे. हेच सांगायला ती तुला फोन करत आहे. पण तू तिचे फोन घेत नाही. शेवटी मी तिचा निरोप घेऊन तुझ्याकडे निघालो होते.
वाचा: राघव चड्ढापेक्षा परिणितीकडे आहे जास्त संपत्ती, कसे जुळले सूत? जाणून घ्या

पुढे अनिश म्हणतो, 'तू मूव्ह ऑन कर. एका अर्थाने चांगलं झाले. कारण आता तू आशाच बाळगू शकत नाही.' हे सगळं ऐकून यशला धक्का बसला आहे. तो म्हणतो, मी तिला शुभेच्छा देतो फोन करुन. कारण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिचं भलं होणार असेल तर मला हेही मान्य आहे. मी फोनवर तिच्याशी भांडणार नाही. तिला शुभेच्छा देणार.

दुसरीकडे हनीमुनला गेलेल्या आशुतोष आणि अरुंधतीसोबत धक्कादायक घटना घडते. त्या घटनेमुळे अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. आता ती घटनेला स्वत: ला दोषी मानू लागली आहे. ती आणि आशुतोष आता घरी परतणार आहेत.

WhatsApp channel