मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

Aai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2023 03:07 PM IST

Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते मालिकेत आता भावनिक ट्रॅक पाहायला मिळत आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सर्वजण त्यांच्या साखरपुड्याच्या तयारीला लागले आहेत. ईशाने मनासारखी शॉपिंग केली आहे. हे सगळं आनंददायी सुरु असतानाचा आता मालिकेत भावनिक ट्रॅक पाहायला मिळत आहे. अरुंधती मुलांबाबात भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती यश आणि अभीशी बोलताना दिसत आहे. अरुंधती यशला सांगत असे, मी तुम्ही तिघेही माझी पहिली जबाबदारी आहात. बाकी सगळे नंतर. तेवढ्यात अभी ते ऐकतो आणि म्हणतो हा अशुतोष सरांवार अन्याय आहे. आई तुला आमची काळजी कमी करावी लागेल. तुला तुझाही विचार करायला हवा. मी यशाल कधीही एकटं सोडणार नाही.

ते ऐकून अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते, 'असेच कायम एकमेकांसोबत रहा. ईशा कडे पण लक्ष द्या. ती लहान आहे. आणि आई अप्पांकडेही लक्ष द्या. तुम्ही आनंदी रहा. बाकी काही नकोय मला. मग कधीच आमच्या डोळ्यात पाणी नाही येणार.'

IPL_Entry_Point

विभाग