कलर्स वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सुरुवातीली प्रसिद्ध होती. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच मालिकेचे कथानाक देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत होते. आता ही मालिका प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटू लागली आहे. तसेच मालिकेत येणारी वळणे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच 'आई कुठे काय करते' मालिकेचा एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत पहिल्या दिवसापासूनच संजना ही अरुंधतीशी नीट वागत नाही. त्यात यशने गौरीला सोडून आरोहीशी लग्न केल्यामुळे तर संजनाला प्रचंड राग आला आहे. ती सतत अरुंधती विरोघात कट कारस्थाने करत असल्याचे दिसते. आई आणि अप्पा हे घर अरुंधतीच्या नावावर करतील असे संजनाला वाटत होते. या सगळ्यात तिने अनिरुद्धचे देखील कान भरले आहेत. आता अनिरुद्ध अप्पा आणि आईवर भडकला आहे. तो त्या दोघांना कोर्टात घेऊन जाण्याची भाषा करत आहे. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला. या प्रोमोवर नेटकरी संतापले आहेत.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल
'आई कुठे काय करते' मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये संजना कांचन आईला घरावरुन खूप काही ऐकवते. त्याचा कांचनला त्रास होतो आणि तिच्या छातीत दुखू लागते. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करतात. तेव्हा आप्पा हे सगळे संजना आणि अनिरुद्धमुळे झाले आहे असे म्हणतात. त्यावर अरुंधतीही त्यांना या घरात ज्येष्ठ नागरिकांवर घरगुती हिंसाचार होतो म्हणून पोलिसांत तक्रार करेन अशी सक्त ताकीद देते.
वाचा: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात
हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करत, 'संजनाची तक्रार करुन काय होणार, ३०० शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती' असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने 'अजून किती अंत बघणार आहेत तुम्ही प्रेक्षकांचा?' असे म्हणत मालिकेवर टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे.
वाचा: काजोलला चांदेकरांनी काढले घराबाहेर, काय असेल कलाचे पाऊल? वाचा 'लक्ष्मीच्या पाऊलांनी'मध्ये काय होणार
संबंधित बातम्या