छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन असल्याचे दिसत आहे. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता याबाबत माहिती समोर आली आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
'आई कुठे काय करते' ही मालिका रोज संध्याकाळी साडेसात वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळते. पण आता मालिकेच्या वेळात दुसरी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण ही मालिका बंद होणार नसून दुसऱ्या वेळेत सुरु होणार आहे. १८ मार्च पासून ही मालिका दुपारी २.३० मिनिटांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: समाजाचा नकार, आर्थिक तंगी पण नंतर बैलगाडी भरून पैसे; दादासाहेब फळकेंविषयी खास गोष्टी
गेली पाच वर्षे 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आईवर आधारित असलेले कुटुंब, कुटुंबातील सदस्यांचे रुसवे-फुगवे, वाद या आशयाची ही मालिका आहे. या मालिकेत आजवर कधीही त्यांचे कुटुंब आनंदी आणि सर्वसामान्य आयुष्य जगत असल्याचे पाहायला मिळाले नाही. सतत मालिकेच्या पात्रांच्या आयुष्यात काही ना काही घडत असते. त्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मालिका टीआरपी यादीमध्ये देखील घसरली असल्याचे समोर आले आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या वेळात स्टार प्रवाह 'घरोघरी मातीच्या चुली' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या मालिकेमुळे 'आई कुठे काय करते' मालिका निरोप घेणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता सत्य समोर आले आहे.
संबंधित बातम्या