स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधतीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. तिच्या या भूमिकांनी प्रेक्षकांची विशेष मने जिंकली. आई आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट करत असते हे दाखवून देणारी ही मालिका एकेकाळी टीआरपी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. आता या मालिकेत वेगळे वळण आले आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली आहे. खऱ्या आयुष्यात ही मालिका पाहून कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी असते हे नुकताच मधुराणीने सांगितले आहे.
मधुराणीला एक लेक आहे. तिला अजून लहान आहे. त्यामुळे तिला या वयात मधुराणी तिला 'आई कुठे काय करते' मालिका पाहण्याची परवानगी देते का? असा प्रश्न तिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर मधुराणीने, "माझी लेक लहान आहे. त्यामुळे आमच्या घरी टीव्ही जास्त पाहिला जात नाही. लेक जो कंटेट पाहते तो तिच्या वयाचाच बघते. त्यामुळे आमच्या घरी प्रत्यक्ष मालिका लावली जात नाही. पण अधून-मधून माझी आई बघत असते. मालिकेतील प्रत्येक ट्विस्टवर तिचे एक मत असते. आता हे काय नवीन, असे काय दाखवत आहेत, मग आता तुला किती संकटाचा सामना करावा लागणार, एवढे कशाला दाखवताय, अजून किती रडत बसणारेस" असे उत्तर दिले.
वाचा: शरद पोक्षेंचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहण्यास नकार, काय आहे कारण?
या मुलाखतीमध्ये मधुराणीने मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारताना कोणत्या आव्हानांना समोरे जावे लागते हे देखील सांगितले आहे. 'सर्वच कलाकार हे संवेदनशील असतात. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवले जाते. कधीकधी त्या भूमिकेत शिरणे आणि त्यातून बाहेर पडणे फार कठीण झालेले असते. सध्या मालिकेत जे सुरु आहे त्याविषयी आम्हालाही माहिती नव्हते. कलाकारांना देखील काम करताना जेव्हा कथा कळाली तेव्हा धक्का बसला' असे मधुराणी म्हणाली.
वाचा: 'या' कारणामुळे इम्रान हाश्मीने आलियासोबत किसिंग सीन देण्यास दिला होता नकार
पुढे मधुराणीने मालिकेविषयी वक्तव्य केले. तिने सांगितले की तिच्या आयुष्यातील आईचा आदर आणखी वाढला आहे. "आईला आपण नेहमीच गृहित धरत आलो आहे. तिचा आपल्यावर प्रचंड जीव असतो. तिचा जीव सतत आपल्या गोष्टींसाठी तुटत असतो. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाढवताना आई तिचे अस्तित्व पूर्णपणे विसरुन जाते. पण या मालिकेच्या माध्यमातून या गोष्टीची जाणीव झाली आहे आणि आईबद्दलचा आदरदेखील वाढला आहे" असे मधुराणी म्हणाली.