छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मग ती संजना असूदेत वा अनिरुद्ध. अरुंधती प्रमाणेच मालिकेतील इतर पात्र ही चर्चेत असतात. सध्या या मालिकेत ‘महाराष्ट्राची सुगरण जोडी’ ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत संजना आणि अनिरुद्ध देखील सहभागी झाले आहेत. या भागाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा अनिरुद्धची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी यांनी सांगितला आहे.
मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नुकताच 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद यांच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं!' असे ते म्हणाले आहेत. दरम्यान मिलिंद यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. त्यावर किचनमध्ये वापरतात ते एप्रन दिसत आहे.
‘कोणाची हिंमत झाली नाही पण कांद्याने रडवलं’ काल शूटिंग मध्ये मला कांदे कापायला लागले, डोळ्यातून पाणी यायला लागलं, जी sceneची गरज होती,मी म्हणजे अनिरुद्ध पहिल्यांदा कांदा कापतो आणि, त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागतं, त्याला काही दिसत नाही आणि तो वैतागतो, आणि म्हणतो “काय कटकट आहे ही” “काय फालतुगिरी आहे कशाला आलोय मी इथे?” आणि नंतर त्याला जाणीव होते की स्वयंपाक करणं काय साधी गोष्ट नाहीय. पूर्वी त्याला असं वाटायचं की स्वयंपाक करणाऱ्या बायका काय फार मोठं काम करत नाहीत, स्वयंपाक करणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. कोणीही करू शकतं, अशी त्याची धारणा होती पण प्रत्यक्षात त्याला जेव्हा स्वयंपाक करायला लागला त्यावेळेला त्याला ही जाणीव झाली की हे काय फार सोपं नाहीये.
आता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये किती लोकांना ही जाणीव असते?, की जी माऊली स्वयंपाक करते (आजकालच्या जमान्यात फक्त माउल्या स्वयंपाक करत नाही तर बरेचसे पुरुष ही स्वयंपाक करतात) पण खरंच किती लोकांना ती जाणीव आहे की जो स्वयंपाक करतो, त्याचे किती कष्ट असतात ते अन्न तयार करण्यामध्ये. पण हल्ली अनेकांना मी बघतो की खाताना तोंडं वाकडी करतात, चवच आली नाही असं म्हणतात किंवा आपण काहीतरी बाहेरून मागू या, घरी बनवलेलं बेचव आहे आणि हल्ली तर काय स्विगी, झोमॅटो अशा असंख्य ॲप्स आले आहेतच, ज्याच्याने आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपल्याला हवं ते मागवू शकतो.
आजकालची मुलं सर्रास बाहेरून अन्न मागवतात, दीडशे दोनशे अडीचशे मध्ये तुम्हाला ते तुमच्या घरपोच मिळतं, पण त्या अन्नाला घरच्या अन्नाची सर येईल का? किंवा ते तितकं हायजिनिक असतं का? कुठल्या प्रकारचं तेल वापरलं असत? पाम तेल? किती स्वच्छता पाळली असेल? घेऊन येणारा कशा पद्धतीने घेऊन येत असेल? हे सगळं रामभरोसेचं आहे. जसजसं आपण ऍडव्हान्स होत जातो तसतसे आपण परावलंबी होत जातोय किंवा सोप्प करायचं प्रयत्न करतो आणि आपल्या तब्येतीची वाट लावून घेतोय, आपल्या शरीराची वाट लावून घेतोय. असं नाहीये की मी कधी बाहेरचं अन्न खात नाही. पण give an a choice जर एखाद्या माऊलीने तीच्या घरात बनवलेलं अन्न असेल आणि बाहेरचं जनरल अन्न असेल, तर मी घरचं केलेलेच अन्न खातो, मग ती माऊली कोणीही असो.
वाचा: एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती
‘आज मला कोणी नाही पण कांद्याने मात्र मला रडवलं’ पण त्या अश्रूंबरोबर माझे पुन्हा एकदा डोळे उघडले प्रत्येक अन्न शिजवणाऱ्या व्यक्तीचं मनापासून आभार मानायला हवेत,त्यांच्या कष्टाची कदर करायला हवी,थोडं कमी जास्त झालं असेल तरीसुद्धा मनापासून त्यांचं ग्रहण केलं तर आपली कायम तब्येत चांगली राहील.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि संजना अप्पांच्या घरातील हक्क मागताना दिसत आहे. ते घर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या