मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

१२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 03:43 PM IST

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने सोशल मीडियावर आशुतोषच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

१२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट
१२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट

एकेकाळी टीआरपी यादीमध्ये अव्वळ स्थान पटकावणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटत आहे. मालिकेचे टीआरपी यादीमधील स्थान घसरले असले तरी प्रेक्षकांना मालिकेतील कलाकारांच्या आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टी जाणून घेण्यात रस आहे. काही दिवसांपूर्वी 'आई कुठे काय करते' मालिकेतील आशुतोषचे अचानक निधन झाले. त्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का बसला. आता अरुंधतीने आशुतोषसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका ही मधुराणी प्रभुलकरने साकारली आहे. तर आशुतोषच्या भूमिकेत ओमकार गोवर्धन दिसत होता. ओमकारने अचानक मालिकेला निरोप दिला. त्यामुळे मधुराणीने त्याच्या आठवणीत एक खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही भावूक पोस्ट वाचून चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.
वाचा: कौतुकास्पद! रितेश देशमुखची मुले फुटबॉल खेळण्यासाठी परदेशात

काय आहे मधुराणीची पोस्ट?

मधुराणीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आशुतोषच्या अपघाताचा सीन शुट करण्यात आल्याचे दिसत आहे. सेटवरचे फोटो शेअर करत तिने, "मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यामुळे ही उशीराने डकवतेय. आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल.... ! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला... पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल" असे म्हटले आहे.
वाचा: ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमासाठी प्रविण तरडेची खास पोस्ट

पुढे ती रडण्याच्या सीनचा उल्लेख करत, "गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे... १२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो.. हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके. या सगळ्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच आहे... डेलीसोप मध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही ( unwind होण्यासाठी ) आणि त्याचे परिणाम दिसून येतात. अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय" असे म्हटले.
वाचा: 'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

या पोस्टमध्ये मधुराणीने ओंकारसोबत असलेल्या मैत्रिचा देखील उल्लेख केला आहे. सेटवर दोघांमध्ये कसे नाते होते याविषयी तिने सांगितले आहे. "ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!" असे अरुंधती म्हणाली.

IPL_Entry_Point