छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे कायमच चर्चेत असते. मालिकेतील अरुंधतीने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच अनिरुद्ध, आशुतोष, संजना, आरोही, अनघा, यश, कांचन आजी, अप्पा हे सर्व कलाकार चर्चेत असतात. सध्या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
मधुराणी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने मालिकेत मनूची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार जान्हवीचे कौतुक केले आहे. मनू शुटिंग करताना किती मन लावून गोष्टी करत असते याबाबतही मधुराणीने सांगितले आहे.
वाचा: 'या' दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार सॅम बहादुर सिनेमा
मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, "मनू , अर्थात जान्हवी...काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते. जेमतेम ६ वर्षांची चिमुरडी...! या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा ,प्रेम patience , लगन हे सगळं अवाक करणारं आहे. मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. We are blessed to have her in team AKKK."
मनूविषयी सांगायचे झाले तर तिचे खरे नाव जान्हवी हरिसिंघानी आहे. जान्हवीने याआधी कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावाने चांगभले मालिकेत गीताची भूमिका साकारली होती. आता 'आई कुठे काय करते' मालिकेतील तिची मनू ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.