मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकर ओळखली जाते. तिची 'आई कुठे काय करते' ही मालिका विशेष गाजताना दिसत आहे. या मालिकेत मधुराणीने अरुंधती ही मुख्य भूमिका साकारली आहे. मधुराणीच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. पण आता मधुराणी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मनाच्या दु:खद अवस्थेवर मात करुन आनंद कसा मिळवला हे सांगितले आहे.
मधुराणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मंगेश पाडगावकर यांची एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता पोस्ट करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एक काळ असा होता जेव्हा मधुराणीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण तिने त्यावर मात करुन योग्य तो मार्ग शोधला.
वाचा: गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
मंगेश पाडगांवकर ह्यांची ही एक सुंदर लघुकविता. "प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की, काहीच मनासारखं घडत नसतं ... सगळंच चुकत असतं, मनावर एक रितेपणाची, दुःखाची छाया पसरलेली असते...! कधी काही कारणाने किवा कधी कारणाशिवाय सुद्धा असं होतं"
वाचा: शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण
मंगेश पाडगावकर म्हणतात अशावेळी सुकलेल्या झाडाला पाणी घालावं. मला या कवितेतले 'सुकलेले झाड' म्हणजे आपल्या मनाचे प्रतिक वाटतं. कुठेतरी आपलं मन सुकलेलं असतं, थकलेलं असतं, हळवं झालेलं असतं, विखुरलेलं असतं. अशा मनाला पाणी घालावं म्हणजे काय तर त्याला विसावा मिळेल, नवजीवन मिळेल असं काहीतरी करावं म्हणजे अर्थातच आपल्याला आनंद वाटेल, सहज आनंद मिळेल असं काहीतरी करावं ते काय असेल हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं.
वाचा: आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट
मी अशावेळी माझ्या आवडीच्या कविता वहीत उतरवून काढते किंवा माझ्या आवडीची गाणी ऐकते. ध्यान करते, एखादा छान पॉडकास्ट ऐकते. तुम्ही काय करता ? (एकच कविता प्रत्येकाला वेगळी जाणवू शकते हे तुम्हाला या कवितेतून काही वेगळा अर्थ कळला असेल तर तोही जरूर सांगा)
मधुराणीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिला कमेंट करत तुला काय झाले आहे, तुझ्या आयुष्यात सगळं ठिक सुरु आहे ना असे अनेक प्रश्न देखील विचारले आहेत.